Ganesh Visarjan 2026 वाळूज महानगरात भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप

मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी; ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक ठरले आकर्षण
Ganesh Visarjan 2026
Ganesh Visarjan 2026 वाळूज महानगरात भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोपfile photo
Published on: 
Updated on: 

Ganesh Visarjan 2026 Farewell to Lord Ganesha in a devotional atmosphere in Waluj metropolis

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा वाळूज महानगर परिसरात शुक्रवारी (दि. २५) लाडक्या गणरायाला ढोल-ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी अबालवृद्धांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Ganesh Visarjan 2026
Jewellery Theft : घरातून सुनेनेच लांबवले ३२ लाखांचे दागिने

ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथकांच्या कवायती आणि विविध मंडळांनी साकारलेले आकर्षक देखावे यामुळे संपूर्ण परिसर गणेशमय झाला होता. गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळपासूनच जय्यत तयारी केली होती. विविध मंडळांनी गणेशमूर्तीची मिरवणूक काढण्यासाठी वाहने आकर्षक पद्धतीने सजविली होती.

दरम्यान नागरीकांनी आरती केल्यानंतर घरात स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी बजाजनगरातील एमआयडीसीच्या सार्वजनिक विहिरीजवळ सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. यंदा परिसरात दुष्काळाचे सावट असल्याने बहुतांश गणेश मंडळांनी उत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले. अन्नदान, सामाजिक उपक्रम तसेच विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली.

Ganesh Visarjan 2026
Ganesh Visarjan Miravnuk : मिरवणुकीत चोरट्यांचा सुळसुळाटः सात महिलांचे दागिने लंपास

सायंकाळी बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकातून गणेश मंडळांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सुरुवातीला सिद्धिविनायक गणपती मंदिराचा मानाचा गणपतीची पालखी त्यापाठोपाठ विविध गणेश मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात व लेझीमच्या तालावर उत्साहात सहभाग घेतला. यावेळी मिरवणूक पाहण्यासाठी कुटुंबासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने मिरवणूक मार्गावरील रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

पोलिसांचा कडक बंदोबस्त

विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी एमआयडीसी वाळूज पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी साध्या वेशातील पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आले होते.

ढोल-लेझीम पथकांनी वेधले लक्ष

शिवनेरी प्रतिष्ठान गणेश मंडळ, हरहर महादेव क्रीडा मंडळ, जय श्रीराम गणेश मित्र मंडळ, सिंहगर्जना गणेश मंडळ, महारुद्र गणेश मंडळ, रणरागिणी महिला गणेश मंडळ, श्री पावन हनुमान गणेश मित्र मंडळ, रुद्रशंभो प्रतिष्ठान, श्री जागृत हनुमान संस्थान गणेश मित्र मंडळ, गरुडझेप मित्र मंडळ, लोकमान्य गणेश मंडळ, अंजनीपुत्र युवा प्रतिष्ठान, महाशिव चॅरिटेबल ट्रस्ट शिवपुत्र प्रतिष्ठान, महाराणा प्रताप युवा प्रतिष्ठान, छत्रपती संभाजी क्रीडा मंडळ, दिशा कुंजबन गणेश मित्र मंडळ, विघ्नहर्ता प्रतिष्ठान, रणसंग्राम गणेश क्रीडा मंडळ व शिवराय युवा मंच आदी मंडळांच्या ढोल-ताशा व लेझीम पथकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत व्यापारी गणेश मित्र मंडळातर्फे महाकालेश्वर-कालीमाता भस्म व अग्निज्वाला तसेच तांडव नृत्याचा सजीव देखावा सादर करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news