मुख्य जलवाहिनीच्या मेनहोलचे काम पूर्णत्वास file photo
छत्रपती संभाजीनगर

मुख्य जलवाहिनीच्या मेनहोलचे काम पूर्णत्वास

शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील महत्त्वाच्या मुख्य जलवाहिनीवरील अडथळे दूर होत असून, दोन दिवसांपूर्वी ढोरकीन जवळील स्कोअरव्हॉल्व्ह फुटल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता.

पुढारी वृत्तसेवा

Work on Main Water Pipeline Manhole Nears Completion

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील महत्त्वाच्या मुख्य जलवाहिनीवरील अडथळे दूर होत असून, दोन दिवसांपूर्वी ढोरकीन जवळील स्कोअरव्हॉल्व्ह फुटल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. मजीप्रा आणि जीव्हीपीआर कंपनीकडून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

त्यासाठी निसर्ग नसरी येथील मेनहोल बंद करून स्कोअर व्हॉल्व्ह जोडणीचे काम रविवारी (दि.१२) रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर आज सोमवारी सकाळी मजीप्राच्या उपअभियंतांमार्फत जलवाहिनीच्या कामाची तपासणी करून पंपिंग सुरू करण्यात येणार असून, नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनीतून पाणी आणले जाईल, अशी माहिती मजीप्राच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी दिली.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जॅकवेलमधून सायफन पद्धतीने पाणी उचलून मुख्य जलवाहिनीत सोडण्यात आले होते. त्यानंतर पंपिंगद्वारे जलवाहिनीची टप्प्याटप्प्याने चाचणी सुरू करण्यात आली. धनगाव, कारकीन, ढोरकीन, कवडगाव, बिडकीन आणि फारोळा या मार्गान पाणी पुढे सरकत आर. एल. स्टील व अजित सीड्स कंपनीपर्यंत पोहोचले. पुढे निसर्ग नर्सरीकडे प्रवास सुरू असतानाच ढोरकीन परिसरात स्कोअर व्हॉल्व्ह फुटला.

त्यामुळे चाचणी प्रक्रियेला अचानक ब्रेक लागला. या घटनेमुळे पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात आला आणि शहराच्या वेशीवर आलेले पाणी माघारी फिरले. दरम्यान, स्कोअरव्हॉल्व्ह फुटल्याने सुमारे तीन एमएलडी पाण्याची नासाडी झाली. त्यानंतर मजीप्रा व जीव्हीपीआर कंपनीने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर दोषग्रस्त स्कोअर व्हॉल्व्ह बदलण्यात यश आले. रविवारी दिवसभर सिमेंट काँक्रीट व पाईप जोडणीची कामे वेगाने पार पडली असून, ती पूर्णत्वास पोहोचली आहेत. या कामांची सोमवारी सकाळी मजीप्राच्या उपअभियंत्याकडून अंतिम तपासणी करण्यात येणार असल्याचे मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT