नवीन पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनी चाचणीत तांत्रिक अडचणींची मालिका सुरूच

कारकीनजवळ जलवाहिनीची निखळली वेल्डिंग : आता स्क्रोल व्हॉल्व्हजवळ पाईप टाकण्याचे विसरले
sambhajinagar news
नवीन पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनी चाचणीत तांत्रिक अडचणींची मालिका सुरूचfile photo
Published on
Updated on

The series of technical glitches during the testing of the new main water supply pipeline continues

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरासाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या चाचणीदरम्यान तांत्रिक अडचणींची मालिका सुरूच असून, कारकीन परिसरात जलवाहिनीचे वेल्डिग निखळल्याचे शनिवारी (दि.२८) समोर आले होते. या दुरुस्तीचे काम रविवारी (दि.२९) रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्याचवेळी धनगावजवळ स्क्रोल व्हॉल्व्हमधून पाणी सोडण्यासाठी आवश्यक असलेला पाइपच बसविण्यात आला नसल्याचे समोर आले. त्यामुळे हा पाईप टाकण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तांत्रिक त्रुटींमुळे चाचणी प्रक्रियेला विलंब होत आहे.

sambhajinagar news
2500 च्या जलवाहिनीचे जॉइंट निखळले

शहराला मुबलक पाणी मिळावे यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कंत्राटदार कंपनी जीव्हीपीआरकडून काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत शहराला पहिल्या टप्प्यात दोनशे एमएलडी पाणी देण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जायकवाडी धरणातून सायफन पद्धतीने पाणी उपसा करून जॅकवेलमध्ये घेण्यात आले. त्यानंतर मुख्य जलवाहिनीची चाचणी घेण्याचे काम सुरू केले.

यात सुमारे साडेतेरा किलोमीटरपर्यंत पाणी यशस्वीरीत्या पोहोचवण्यात आले. मात्र कारकीन परिसरात पाणी पोहोचल्यानंतर जलवाहिनीच्या वेल्डिंगमध्ये दोष आढळला. त्यानंतर पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. कंत्राटदार कंपनीकडून जलवाहिनीच्या वेल्डिंगचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

sambhajinagar news
गॅपमुळे नक्षत्रवाडीजवळ मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम अपूर्ण

दरम्यान, धनगाव परिसरात बसविण्यात आलेल्या स्क्रोल व्हॉल्व्हमधून पाणी बाहेर सोडण्यासाठी आवश्यक असलेला छोटा पाइप बसवलेलाच नसल्याचे लक्षात आले. ही गंभीर त्रुटी लक्षात येताच कंत्राटदार कंपनीने तातडीने खोदकाम सुरू केले आहे. त्याठिकाणी शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी आणि नवीन ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे.

त्यामुळे या दोन्ही जलवाहिनीला धक्का न लागता स्क्रोल व्हॉल्व्हजवळ पाईप टाकला जाणार आहे. हे काम अत्यंत किचकट असून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनींना धक्का न लागता हे काम करावे लागणार आहे. हे काम दोन दिवसांत केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले असून, त्यानंतरच मुख्य जलवाहिनीची चाचणी घेता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news