मुख्य जलवाहिनीच्या वेल्डिंगचे काम संपले

आजपासून पुन्हा चाचणीला सुरुवात, स्कोर व्हॉल्व्हच्या पाईपचे काम अंतिम टप्प्यात
sambhajinagar water pipeline news
मुख्य जलवाहिनीच्या वेल्डिंगचे काम संपलेfile photo
Published on
Updated on

The welding work on the main water pipeline has been completed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरासाठी टाकण्यात आलेल्या मुख्य २५०० मिमी व्यासाच्या जललवाहिनीतून पाणी उपशासह गळतीची चाचणी सध्या सुरू आहे. यात शुक्रवारी कारकीन परिसरात जलवाहिनीचे वेल्डिग निखळल्याचे लक्षात येताच तातडीने पाणी बंद करून दुरुस्ती सुरू केली. हे काम सोमवारी दुपारी पूर्ण झाले आहे. आता रात्रीतून धनगावजवळील स्कोर व्हॉल्व्हच्या पाईपची जोडणी करून आज मंगळवार (दि.३१) पासून पुन्हा चाचणी सुरू केली जाणार आहे.

sambhajinagar water pipeline news
नवीन पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनी चाचणीत तांत्रिक अडचणींची मालिका सुरूच

शहरवासीयांना पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका प्रशासन आणि कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत २०० एमएलडी पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडी धरणातून सायफन पद्धतीने यशस्वीरीत्या जॅकवेलमध्ये पाणी घेतले.

त्यानंतर ३७०० अश्वशक्तीचे दोन्ही पंप, एक-एक करून सुरू केले. त्यातून यशस्वीरीत्या पाण्याचा उपसा केला. आता मागील आठवडाभरापासून जॅकवेलमधून पाणी उपसा करून ते मुख्य २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून नक्षत्रवाडीच्या दिशेने नेले जात आहे. कारकीनपर्यंत यशस्वी चाचणी सुरू असतानाच १३.५० किलोमीटर अंतरावर मुख्य जलवाहिनीचे वेल्डिग निखळल्याने त्यातून पाणी गळती सुरू असल्याचे अढळले. त्यानंतर लगेच दुरुस्ती कामाला सुरुवात नव्या जलवाहिनीचे निखळ-लेले जॉइंट वेल्डिंगद्वारे पूर्ण जोडण्यात आले.

sambhajinagar water pipeline news
2500 च्या जलवाहिनीचे जॉइंट निखळले

अतिशय जलवाहिनीचे वारकाईने निखळलेली आता वेल्डिग पुन्हा दुरुस्त करण्यात आले. हे काम सोमवारी दुपारी पूर्ण झाले आहे. धनगावजवळ स्कोर व्हॉल्व्हच्या पाईपची दुरुस्ती केली जात आहे. दरम्यान, हे काम मंगळवारी सकाळपर्यंत पूर्ण करून पुन्हा जलवाहिनीतून पाणी उपशाची चाचणी सुरू केली जाणार आहे.

नक्षत्रवाडीदरम्यान या मुख्य जलवाहिनीवर कुठे गळती आहे की नाही, याबाबत विशेष दाब देऊन चाचणी घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या चाचणीनंतर जलवाहिनी वॉशिंग करण्याचे काम केले जाणार आहे. काम दर्जेदार झाले की नाही, याची चाचणी सध्या सुरू असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या चाचणीत शिल्लक असलेली किरकोळ कामे पुढे येत आहेत. ती पूर्ण केल्यानंतरच जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जाणार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आजपासून पुन्हा चाचणीला सुरुवात होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news