International Women's Day : बाईक रॅलीतून महिला शक्तीचा जागर file photo
छत्रपती संभाजीनगर

International Women's Day : बाईक रॅलीतून महिला शक्तीचा जागर

जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाचा उपक्रम; महिलांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

Women's empowerment awakened through bike rally

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाच्या संयुक्त पुढाकारातून शहरात सुपर वुमन बाईक रॅली काढण्यात आली. विविध विभागांतील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या रॅलीने महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश दिला.

क्रांती चौक येथून सकाळी साडेसात वाजता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ झाला. रॅलीत उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण यांच्यासह अनेक महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या. क्रांती चौकातून निघालेली रॅली पैठण गेट, तापडिया रंगमंदिर आणि औरंगपुरा भाजी मंडीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. मार्गात महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून स्त्री शिक्षण आणि समानतेच्या लढ्याची आठवण जागविण्यात आली.

या उपक्रमासाठी पोलिस आयुक्त कार्यालय आणि वाहतूक शाखेचे विशेष सहकार्य लाभले, तर रेड स्वास्तिक संघटनेने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीचा समारोप झाला. उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांनी प्रास्ताविक केले, तर अश्विनी लाठकर यांनी आभार मानले.

यावेळी सुपर वूमन रॅलीत मोठ्या संख्येने विविध शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी झाल्या होत्या.

समाज उभारणीत महिला महत्त्वाचा स्तंभ

रॅलीच्या समारोप प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, महिला समाजाच्या उभारणीतील महत्त्वाचा स्तंभ आहेत. त्यांनी स्वतःच्या क्षमता आणि नेतृत्वगुण ओळखून विकास केल्यास समाजाची प्रगती वेगाने होईल. शिक्षण, प्रशासन, उद्योग आणि क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत महिलांनी देशाचा मान उंचावला असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT