महिलांनी तक्रार करायची कोणाकडे file photo
छत्रपती संभाजीनगर

महिलांनी तक्रार करायची कोणाकडे

पैठण येथील महिला समुपदेशन केंद्र अनेक दिवसांपासून बंद

पुढारी वृत्तसेवा

Women's Counseling Center in Paithan Closed for Many Days

पैठण, पुढारी वृत्तसेवा : शहरासह ग्रामीण भागातील महिलेवरील अत्याचार व त्यांच्या संबंधित गुन्ह्याची वाढती संख्या लक्षात घेऊन पैठण तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात महिला समुपदेशन केंद्र काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते.

तीन महिन्यांपूर्वी पती-पत्नीच्या वादाच्या तक्रारीतून या केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या खासगी तत्वावरील कर्मचाऱ्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. तेव्हापासून महिला समुपदेशन तक्रार निवारण केंद्र बंद असल्याने महिलांनी तक्रार करायची तर कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहरासह ग्रामीण भागातील महिलांना कायदेशीर सल्ला व योग्य समुदेशन मिळावे यासाठी स्वयंसेवा संस्थेच्या माध्यमातून पैठण शहरातील पोलिस ठाण्याच्या आवारात महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रामध्ये महिला, पुरुष कर्मचारी खासगी तत्वावर कार्यरत होते परंतु या केंद्रांतर्गत एका पती-पत्नीचा घरगुती वाद निर्माण झालेला होता. तीन महिन्यांपूर्वी एका खासगी कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रश्नी कारवाई केली. तेव्हापासून हे समुपदेशन केंद्र बंद आहे.

दरम्यान, या ठिकाणी शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील कौटुंबिक तक्रारी घेऊन महिला येतात, समुपदेशन केंद्र बंद असल्याने आल्या पावलांनी त्यांना वापस जावे लागते. थेट छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामीण पोलिस कार्यालयात धाव घ्यावी लागत असल्याने वेळेसोबत आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT