Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर, सहा दिवसांत बिबट्याच्या दुसऱ्या हल्ल्याने गारज हादरले  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर, सहा दिवसांत बिबट्याच्या दुसऱ्या हल्ल्याने गारज हादरले

महिलेवर स्वतःच्या शेतात काम करीत असताना बिबट्याने अचानक हल्ला केल्याने शेतकरी महिला जखमी झाल्याची घटना दुसऱ्यांदा घडली.

पुढारी वृत्तसेवा

Woman seriously injured in leopard attack

गारज, पुढारी वृत्तसेवा वैजापूर तालुक्यातील गारज येथे बिबट्याचा आणखी एका महिलेवर स्वतःच्या शेतात काम करीत असताना बिबट्याने अचानक हल्ला केल्याने शेतकरी महिला जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.८) रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान दुसऱ्यांदा घडली. अनिता रामहरी सरोवर (वय ३२) असे जखमी महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात याच परिसरात बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून जखमी केले होते. सलग दोन महिलांवर झालेल्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

अनिता सरोवर या आपल्या शेतवस्तीसमोरील गट नं. २१२ मधील शेतात कपाशी पिकाची निंदणी करत असताना दुपारी बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांची साडी जबड्यात पकडून वीस फुटांपर्यंत फरफटत नेले. यादरम्यान अनिताबाई यांनी आरडाओरड करून स्वतःची सुटका करून घेत शेतवस्तीकडे धाव घेतली.

आरडाओरड ऐकून नातेवाईक आजूबाजूला असलेले शेतकरी मदतीला धावून आले. यामधे अनिता जखमी होऊन घाबरून गेल्याने त्यांना उपचारासाठी देवगाव रं येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जे. जैन यांनी जखमी महिलेवर उपचार केले. गेल्या सहा दिवसांत आणखी महिलेवर दुसऱ्यांदा बिबट्याचा हल्लाची पुनरावृत्ती झाल्याने गारज गाव हादरून गेले आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या घटनेबाबत वृत्त प्रकाशित करताच वनविभागाने प्रतिनिधी यांनाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. बिबट्यामुळे जखमी झालेल्या महिलेचे फोटो उपलब्ध करून द्या, असा उलटा सवालच वनविभागाने गारजचे प्रतिनिधी यांना केला होता. तुम्ही ३ सप्टेंबर रोजी महिला जखमीची बातमी छापली होती. तर तुम्हीच मला त्या जखमी महिलेचे फोटो द्या, असा हट्टच वनपरिक्षेत्र अधिकारी भिसे यांनी केला होता. त्यातच पुन्हा ही घटना घडली तरी वनविभागाला याचे सोयरसुतक नसल्याचे ग्रामस्थांना दिसल.

नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

वनविभागाने आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ङ्गङ्घबिबट्याला पकडून कारवाई होणार की केवळ आरोप-प्रत्यारोप? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यात यावे नसता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विभागप्रमुख प्रभाकर जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT