Ghati Hospital News : घाटीत तीन महिने व्हेंटिलेटरवर यशस्वी उपचाराने महिला ठणठणीत File Photo
छत्रपती संभाजीनगर

Ghati Hospital News : घाटीत तीन महिने व्हेंटिलेटरवर यशस्वी उपचाराने महिला ठणठणीत

अहोरात्र सेवासुश्रुषा, डॉक्टरांच्या पाठीवर अधिष्ठातांकडून कौतुकाची थाप

पुढारी वृत्तसेवा

Woman recovers after successful treatment on ventilator for three months at Ghati Hospital

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विषारी औषध प्राशन केल्याने अत्यंत गंभीर अवस्थेत घाटीत दाखल महिला रुग्ण तीन महिने व्हेंटिलेटरवर यशस्वी उपचारानंतर बरी होऊन नुकतीच घरी परतली. तत्पूर्वी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते या महिलेचा सत्कार करण्यात आला. तसेच तीची अहोरात्र सेवासु-श्रूषा करणाऱ्या डॉक्टरांच्या टिमचाही सत्कार करत अधिष्ठातांनी कौतुकाची थाप दिली.

घाटीतील अपघात विभागात ही महिला रुग्ण मोनोसिल कंपाऊंडच्या सेवनामुळे तीव्र श्वसन अपयशाच्या अवस्थेत दाखल झाली होती. तातडीने इंटुबेशन करून तिला एमआयसीयूमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. रुग्णाची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने दीर्घकाळ व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवावे लागले. या दीर्घकालीन आणि गुंतागुंतीचे दैनंदिन औषधोपचार व निरीक्षण तसेच डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या प्रयत्नांमुळे रुग्णाचा व्हेंटिलेटर सपोर्ट कमी करून पुढील उपचारानंतर वॉर्डमधून डिस्चार्ज देण्यात आला.

अधिष्ठाता डॉ सूक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ सुचिता जोशी, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. प्रशांत गजभारे यांच्या देखरेखीखाली डॉ. लामत नूर, डॉ. मसरत खान, डॉ. शुभम घोघळ, डॉ. रुपेश वानखेडे, डॉ. सागर पवार, डॉ. विकास सिंह, डॉ. श्रीवस्त ईश्वरन आणि डॉ. भाविका सरोदे, डॉ. वीणा मालानी यांनी उपचार केले.

रुग्णकेंद्रित सेवेचे यश

तीन महिन्यांहून अधिक काळात औषधोपचारानंतर ठणठणीत होऊन घरी जाताना महिला आणि तिच्या नातेवाइकांएवढाच आनंद डॉक्टर, परिचारिकांनाही झाला. सोबतच इतके दिवस अखंड, संवेदनशील व रुग्णकेंद्रित सेवा प्रशंसनीय ठरली, रुग्ण बरे झाल्याचे समाधानही डॉक्टरांच्या चेहऱ्यावर उमटले.

रुग्णाला मानसिक आधारासोबत आत्मविश्वास

दीर्घकालीन रुग्णालयात राहिल्याने रुग्णास मानसिक ताण व नैराश्य जाणवल्याने मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात आले. याकाळात डॉक्टर व नर्सिंग स्टाफने रुग्णाला मानसिक आधार, प्रेरणा आणि आत्मविश्वास जागृत केल्याने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT