

The city is under tight security for the New Year's celebrations.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
२०२५ वर्षाला निरोप आणि २०२६ या नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कडेकोट बंदोबस्त नेमण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणारा उत्साह लक्षात घेता, शहरात घातपात, छेडछाड आणि अपघातासारख्या घटना रोखण्यासाठी फिक्स पॉइंट्स, चेक पोस्ट आणि विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरातील सिटी चौक, वेदांतनगर, पुंडलिकनगर, दौलताबाद, वाळूज, एम वाळूज, सिडको, एम सिडको, छावणी, बेगमपुरा, हसूल, मुकुंदवाडी, जवाहरनगर, उस्मानपुरा, जिन्सी, सातारा, क्रांती चौक आदी १७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. यामध्ये सिटी चौक, क्रांती चौक, निराला बाजार, कॅनॉट प्लेस, टीव्हीसेंटर आणि रेल्वेस्टेशन यासारख्या गर्दीच्या ठिकाणांचा समावेश आहे. प्रत्येक पॉइंटवर १ उपनिरीक्षक आणि ५ कर्मचारी (शत्रधारी कर्मचाऱ्यासह) तैनात असतील. हा बंदोबस्त ३१ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासूनच कार्यान्वित होणार आहे.
मद्यपी वाहनचालकांवर कारवाई
नववर्षाच्या रात्री होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचे ड्रिंक्स अँड ड्राईव्ह पथक सक्रिय असेल. शहरातील हर्मूल नाका, जालना नाका, बीड नाका, पैठण रोड नाका, दौलताबाद टी पॉइंट, वाळूज नाका अशा ७ महत्त्वाच्या चौकांमध्ये बॅरिकेडिंग करून वाहनांची तपासणी केली जाईल. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर ब्रेथ अॅनालायझर यंत्राद्वारे कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हॉटेल आणि ढाब्यांवर विशेष पथकाची नजर
हॉटेल, ढाबे आणि लॉजेसमध्ये मद्यप्र-शिनानंतर होणारे वाद आणि मुलींची छेडछाड रोखण्यासाठी गुन्हे शाखेची ५ विशेष पथके गस्त घालणार आहेत. ही पथके अनाधिकृत दारू विक्री, सराईत गुन्हेगार आणि शहराच्या सीमांवर नाकाबंदी शहरात येणाऱ्या प्रत्येक संशयास्पद वाहनाची तपासणी करण्यासाठी हसूल नाका, जालना नाका, बीड नाका, पैठण रोड आणि वाळूज नाका यासारख्या ६ ठिकाणी चेक पोस्ट उभारले आहेत.
समाजकंटकांवर प्रतिबंधक कारवाई करतील. तसेच शहरातील हॉटेल्सना दिलेल्या वेळेतच ते बंद होतील याची खबरदारी घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विशेष पथके
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूच नेनुसार, परिमंडळ १ आणि २ चे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, प्रशांत स्वामी यांच्या देखरेखीत बंदोबस्त तैनात असणार आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त आपापल्या विभागाचे प्रभारी असतील, तर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आपापल्या हद्दीतील बंदोबस्ताचे नेतृत्व करतील. आर्थिक गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष, सायबर सेल आणि अमली पदार्थ विरोधी पथक मिळून ८ विशेष पेट्रोलिंग पथके शहरात फिरतीवर असतील. अनुचित प्रकार घडल्यास नियंत्रण कक्षात स्ट्रायकिंग फोर्स, क्यु.आर.टी, वज्र आणि वरुण ही विशेष वाहने सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.
सोशल मीडिया आणि होर्डिंगवर लक्ष
महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक उत्सवाच्या नावाखाली महिलांची किंवा तरुणींची छेडछाड होऊ नये यासाठी विशेष दामिनी पथक गस्त घालणार आहे. हे पथक शहरातील हॉटेल, ढाबे आणि मोठ्या कार्यक्रमांच्या ठिकाणी सतत भेट देऊन खोडकर तरुणांवर नजर ठेवेल.
पोलिस आयुक्तांचे आवाहन
नागरिकांनी नववर्षाचे स्वागत उत्साहात पण शांततेत करावे. पोलिसांनी जनतेशी सौजन्याने वागून त्यांना शुभेच्छा द्याव्यात, मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे निर्देश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले आहेत. जातीय सलोखा बिघडू नये यासाठी वादग्रस्त पोस्टर्स, बॅनर्स किंवा सोशल मीडियावरील पोस्टवर पोलिसांची विशेष शाखा आणि सायबर सेल लक्ष ठेवून असणार आहे.