Sambhajinagar Crime : फ्लॅटमध्ये वैश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक; पीडितेची सुटका  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : फ्लॅटमध्ये वैश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक; पीडितेची सुटका

नंदनवन कॉलनीत पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Woman arrested for running prostitution business in flat; victim released

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: भाड्याने फ्लॅट घेऊन तिथे वैश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिलेला छावणी पोलिसांनी डमी ग्राहकामार्फत छापा मारून रंगेहात पकडले. व एका पीडितेची सुटका केली. ही कारवाई शनिवारी (दि. ३०) दुपारी तीन वाजेच्या सुमारास नंदनवन कॉलनीत करण्यात आली. मिनाज उस्मान वेग (४५, रा. विठ्ठल विशाखा अपार्टमेंट, फ्लॅट क्र. १, नंदनवन कॉलनी) असे वैश्याव्यवसाय चालविणाऱ्या आरोपी महिलेचे नाव असल्याची माहिती छावणी ठाण्याचे प्रभारी एपीआय विवेक जाधव यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला नंदनवन कॉलनी भागातील अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये पीडित महिलांना ठेवून त्यांच्याकडून मर्जीविरुद्ध वैश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती छावणी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एसीपी संजय सानप, एपीआय विवेज जाधव, पीएसआय नागवे, जमादार पायघन, सोरमारे, मीना जाधव, सविता लोंढे आणि महिला दक्षता समिती सदस्यांसह सापळा नियोजन केले.

त्यासाठी एक डमी ग्राहक तयार केला. त्याच्याकडे २ हजार रुपये आणि सूचना देऊन दुपारी तीन वाजेच्या सुमारास आत पाठवले. त्याने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा मारला. तिथे वेग हिने २ हजार घेऊन पीडित महिलेला बेडरूममध्ये पाठवले असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत बेग हिने सांगितले की, हा फ्लॅट तिने दरमहा ६ हजार रुपये भाडे देऊन घेतला असून, सध्या एकच महिला असल्याचे सांगितले.

घरझडतीत मोबाईल, पाच निरोध पाकिटे असा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दौलताबाद ठाण्याच्या निरीक्षक रेखा लोंढे यांच्याकडे देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT