Nathsagar Dam
Nathsagar Dam : नाथसागरातील पाण्याची आवक थांबली File Photo

Nathsagar Dam : नाथसागरातील पाण्याची आवक थांबली

गोदावरी नदीत ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
Published on

Water inflow into Nathsagar stopped

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पाऊस थांबल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या पैठण येथील नाथसागर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली असून, रविवारी (दि.३१) धरणाचे १८ दरवाजे अर्धा फूट खुले ठेवून गोदावरी नदीत ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती धरण उपअभियंता मंगेश शेलार यांनी दिली आहे.

Nathsagar Dam
Rudreshwar Ganesh Caves : तीन हजार वर्षांपूर्वींची गणेशमूर्ती

नाथसागर धरणाच्या वरील भागात व परिसरात कमी अधिक प्रमाणावर पाऊस पडत असल्याने व रविवारी दि. ३० रोजी सुरू अस लेला पाऊस काही प्रमाणावर थांबला आहे. गेल्या अकरा दिवसापासून नाथसागर धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आलेले होते. या दरवाज्यातून गोदावरी नदीत ७५ हजारहून अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला.

परंतु धरणामध्ये उपलब्ध होणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन रविवारी रोजी धरणाची १८ दरवाजे अर्धे फूट खुले ठेवून ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला असून. नाथसागर धरणाच्या वरील भागांतून १४ हजार ९७ क्युसेक पाण्याचे आवक सुरू असल्याने धरणाच्या पाण्याची टक्केवारी ९९.१२ झाली. दरम्यान, आज सोमवारी रोजी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढ झाल्यास उघडलेले धरणाचे दरवाजातून गोदावरी नदी पाण्याचा विसर्ग काही प्रमाणावर वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या सूत्रांकडून समजली.

Nathsagar Dam
51 Ganesha idols : ५१ गणेशमूर्ती साकारून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

महसूल मंडळात झालेला पाऊस

पैठण तालुक्यातील विविध महसूल मंडळांत पडलेल्या पावसाची नोंद केल्यी माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली असून, यामध्ये पैठण ४८१, पिंपळवाडी पि. ४५४, बिडकीन ६०७, ढोरकीन ४११, बालानगर ४९०, नांदर ६५८, आडुळ ५३८, पाचोड ५४२, लोहगाव ६३०, विहामांडवा ५१६ मिलिमीटर पाऊस पडला असून, आतापर्यंत एकूण ५३२७ सरासरी ५३२.७ नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news