Wild boars destroy an acre of corn
जरंडी, पुढारी वृत्तसेवा :
कापणीवर आलेल्या उभ्या मक्यावर रानडुकरांच्या कळपांनी शनिवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास ताव मारून एक एकर क्षेत्रातील मक्याची कणसे फस्त केली. ही घटना रावेरी शिवारात घडली.
कराळा (ता. सोयगाव) गावालगत असलेल्या रावेरी शिव ारात एकनाथ चिंधू पाटील यांनी रब्बीच्या हंगामात गट नंबर २१ मध्ये मक्याची लागवड केली होती. ते या मक्याची कापणी करणार होते.
परंतु त्या आधीच रानडुकरांच्या कळपांनी ताव मारून एकाच रात्री एक एकर क्षेत्रावरील मक्याची कणसे फस्त केली. रविवारी वनरक्षक शिवाजी चौधरी यांनी घटनास्थळी येऊन नुकसानीचा पंचनामा केला.
सदर शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई मिळावी व या शिव- ारात रानडुकरांच्या कळपाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.