Sambhajinagar News : हर्सूलच्या आगीतील दोषींवर कारवाई का नाही ? नगरसेवकांचा प्रशासनाला जाब file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : हर्सूलच्या आगीतील दोषींवर कारवाई का नाही ? नगरसेवकांचा प्रशासनाला जाब

कंत्राटदाराला नुकसानभरपाई न देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Why is no action taken against the culprits in the Harsul fire? The corporators question the administration

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हर्मूल कचरा प्रक्रिया केंद्रातील आगीच्या घटनेला अनेक दिवस उलटूनही दोषींवर काय कारवाई केली, याचा खुलासा प्रशासनाकडून झालेला नाही. आगीचे नेमके कारण, कंत्राटदाराची जबाबदारी आणि प्रकल्पातून महापालिकेला मिळणारे उत्पन्न अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत भाजप नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी गुरुवारी (दि.२६) स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला जाब विचारला. याप्रकरणी चौकशी करून पुढील बैठकीत सविस्तर माहिती देण्याचे आदेश सभापती अनिल मकरिये यांनी दिले.

हसूल येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला १८ नोव्हेंबर रोजी भीषण आग लागली होती. या घटनेत मोठे नुकसान झाले. आग नेमकी कशामुळे लागली, की ती जाणीवपूर्वक लावण्यात आली ? विम्याची रक्कम मिळविण्यासाठी आग लावल्याचा संशय आहे का, असे प्रश्न नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी उपस्थित केले.

तसेच हर्मूलसह शहरातील अन्य तीन कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे काम मायो वेसल्स कंपनीला देण्यात आले आहे. या कामाची निविदा कधी काढली, कंत्राट किती वर्षांसाठी दिले, कचऱ्यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या खताच्या विक्रीतून महापालिकेला किती उत्पन्न मिळते आणि निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, याची माहिती त्यांनी मागितली. संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा घेण्याची मागणीही केली. दरम्यान, एमआयएमच्या नगरसेवकांनीही चौकशीची मागणी केली. हर्मूल केंद्रात कचऱ्याचे डोंगर साचले असून, वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे परिसरात अग्निशमन केंद्र सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.

कंत्राटदाराला एक रुपयाही देऊ नका !

आगीत प्रक्रिया केंद्रातील शेड आणि यंत्रसामग्रीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई महापालिकेने करू नये. संबंधित कंत्राटदाराला एक रुपयाही देऊ नये, अशी मागणी नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT