Sambhajinagar News : स्थायी समिती सभापतींचे मुख्य लेखाधिकाऱ्यांचा पदभार काढण्याचे निर्देश

तीन पत्रांनंतरही पाच वर्षांच्या उत्पन्न खर्चाचा हिशेब नाही : चौकशी पूर्ण होईपर्यंत लेखापरीक्षकांकडे पदभार देण्याची सूचना
Sambhajinagar News
Sambhajinagar News : स्थायी समिती सभापतींचे मुख्य लेखाधिकाऱ्यांचा पदभार काढण्याचे निर्देशfile photo
Published on: 
Updated on: 

Standing Committee Chairperson’s directive to strip the Chief Accounts Officer of their charge

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा तीन वेळा पत्रे देऊनही उत्पन्न-खर्चाचा तपशील न दिल्याने गुरुवारी (दि. २६) स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत पदभारातून बाजूला करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यांच्या जागी लेखापरीक्षक शिवाजी नाईकवाडे यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्याची सूचना केली.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : साडेतीनशे कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग; अकॅडमिक, परीक्षा विभागाचे कामकाज ठप्प

महापालिकेच्या विविध विभागांतील ५४६ कोटी रुपयांच्या लेखापरीक्षणाचा मुद्दा तापला असतानाच लेखा विभागाचे गेल्या पाच वर्षांपासून लेखापरीक्षण झाले नसल्याचे गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत समोर आले. या बैठकीच्या सुरुवातीला विकासकामांच्या अंदाजपत्रकीय प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर हर्मूल आणि पडेगाव कचरा डेपोच्या विषयांवर चर्चा झाली.

पुढील बैठकीत स्पष्टीकरण देण्याची सूचना केल्यानंतर सभापती मकरीये यांनी लेखा विभागाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच वाहुळे यांना ५ मे, १५ ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्पन्न खर्चाचा तपशील व अभिलेख देण्यासाठी पत्रे दिली होती. मात्र, उत्तर मिळाले नाही. पाच वर्षांत किती धनादेश दिले आणि किती रक्कम खर्च झाली, याची माहितीही सादर झाली नाही.

यावर नगरसेवक अमित भुईगळ यांनी एकतर्फी कारवाई न करता स्पष्टीकरण घेण्याची मागणी केली. त्यावर नाईकवाडे यांनी त्यांनाही लेखा विभागाचे अभिलेख मिळाले नसल्याचे सांगितले. त्यानंतर सभापतींनी सभा संपल्याचे जाहीर करून राष्ट्रगीत सुरू केले.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : साडेतीनशे कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग; अकॅडमिक, परीक्षा विभागाचे कामकाज ठप्प
ऑडिटसंदर्भातील माहिती न दिल्याप्रकरणी सभापतींनी संबंधित अधिकाऱ्याचा पदभार काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या निर्णयामागील कारणे, त्याचा आधार व कायदेशीर बाबी तपासणे आवश्यक आहे. स्थायी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त अद्याप माझ्यासमोर आलेले नाही. त्यामुळे इतिवृत्त आणि संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतरच प्रशासनाची भूमिका स्पष्ट करता येईल.
अमोल येडगे, आयुक्त महापालिका

इतर विभागांनाही कारवाईचा इशारा

लेखापरीक्षणासाठी माहिती न देणाऱ्या अन्य विभागांवरही कारवाई केली जाईल. महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ देणार नाही, असे सभापती अनिल मकरिये यांनी स्पष्ट केले.

दालनात पाऊण तास खलबते

स्थायी समिती बैठकीतील या निर्णयानंतर आयुक्त अमोल येडगे यांनी सभापती अनिल मकरिये यांना चर्चेसाठी दालनात बोलावले. बैठकीला संतोष वाहुळे, शिवाजी नाईकवाडे, नगरसेवक राजगौरव वानखेडे आणि अमित भुईगळ उपस्थित होते. याप्रकरणावर सुमारे पाऊण तास चर्चा झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.