गणेश ढगे, अक्षय खरात  
छत्रपती संभाजीनगर

Warudkazi minor assault case |खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा १४ वर्षीय मुलावर अत्याचार, गुंड मामा-भाच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

वरुडकाझी : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा १४ वर्षीय मुलावर अत्याचार, गुंड मामा-भाच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : 'चल, तुला खाऊ घालतो,' असे आमिष दाखवून १४ वर्षीय शाळकरी मुलाला कारमधून अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (दि.२६) वरूड काझी ते गंगापूर जहांगीर रस्त्यावरील एका बंद इमारतीत घडली. आरोपी मामा आणि भाच्याने मिळून मुलाला प्लास्टिकच्या बांबूने अमानुष मारहाण केली व त्याच्यावर अत्याचार केला. कोणाला सांगितलेस तर तुझा मर्डर करून टाकीन, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात पोक्सो आणि अपहरणासह विविध गंभीर कलमांन्वये मामा-भाच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश सीताराम ढगे (रा. महालपिंप्री) आणि त्याचा भाचा अक्षय संजय खरात (रा. आंबेडकरनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती चिकलठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय शाळकरी मुलगा इयत्ता नववीत शिकतो. आरोपी गणेश ढंगे याने ओळख वाढवून मुलाला वारंवार गाडीतून सोडण्याचे व खाऊ घालण्याचे आमिष दाखवले होते. एक महिन्यापूर्वीही आरोपीने मुलाला कल्पतरू हॉटेलजवळ नेऊन त्याच्यासोबत अश्लील चाळे केले होते व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती.

रविवारी (दि.२६) दुपारी ४ वाजेच्या सुमारास पीडित मुलगा वरूड काझी येथे मित्राच्या टपरीवर उभा असताना गणेश ढगे आणि अक्षय खरात हे कारमधून तिथे आले. त्यांनी मुलाला बळजबरीने गाडीत बसवून त्याचे हात-पाय बांधले. यानंतर धनराज नावाच्या एका मुलाला गाडीत बसविले. यावेळी आरोपींनी पीडित मुलाच्या १२ वर्षीय बहिणीलाही गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र ती निसटून पळून गेल्याने बचावली दोघांना वरूड काझी ते गंगापूर जहांगीर रस्त्यावरील एका बंद पडलेल्या इमारतीत नेले. तिथे दोन्ही आरोपींनी दारू पिऊन मुलासह धनराजला प्लास्टिकचे बांबू देऊन एकमेकांना मारायला लावले. तेथून पुन्हा दारूच्या दुकानावर गेले.

तिथे मुलाला जबरदस्तीने दारू पाजली. धनराज निघून गेल्यानंतर पुन्हा पीडित मुलाला घेऊन दोघे मामा-भाचे त्याच इमारतीत आले. तिथे त्याला प्लास्टिकच्या बांबूने पुन्हा बेदम मारहाण केली. दोघांनीही त्याच्यावर अनैसर्गिक व अमानुष अत्याचार केला. मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला खाली पाडून मारहाण केली. मुलाने आरडाओरड केली, मात्र कोणीही मदतीला आले नाही. त्याचा मोबाईलही आरोपींनी हिसकावला होता. दरम्यान, त्यांच्या तावडीतून सुटून तो इमारतीच्या बाहेर पळाला. तेव्हा पुन्हा त्याला पकडून दोघांनी कारमध्ये बसविले.

'मी अगोदर एक मर्डर आणि एक हाफ-मर्डर केला आहे, तुझाही मर्डर करून टाकील,' अशी धमकी देऊन रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याला नारेगावात उतरविले. तेथून एका ऑटोत बसवून पसार झाले. मुलाने आपल्या मित्रांना बोलावून थेट चिकलठाणा पोलिस ठाणे गाठले. तेथून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे करत आहेत.

आरोपी ढगे हा सराईत गुन्हेगार

आरोपी गणेश ढंगे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर सहा महिन्यांपूर्वीच त्याने एकावर जीवघेणा हल्ला केल्याने जेलमध्ये जाऊन आलेला आहे. तो कायम नशेत राहतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT