Jayakwadi Dam water level |जायकवाडीची 70 टक्क्यांकडे वाटचाल

३५ हजार ५५१ क्यूसेक आवक सुरू; अहिल्यानगर, नाशिकमधील विसर्गाचा परिणाम
Jayakwadi dam water level
Jayakwadi dam water level
Published on
Updated on

पैठण : अहिल्यानगर व नाशिक विभागातील धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा ६४.४७ टक्क्यांवर मंगळवारी (दि.२८) रात्री दहा वाजेपर्यंत पोहोचला आहे. धरणात ४९.४२ टीएमसी (१,३९९.५२९ दलघमी) इतका जिवंत पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, नांदूर-मधमेश्वर वेअरमधून २५, ९२५ क्यूसेक पाण्याचा प्रवाह गोदावरी नदीपात्रात पुढे सोडला जात असल्याने जायकवाडी धरणाचा पाणीसाठा बुधवारी ७० टक्क्यांवर जाईल, अशी माहिती अभियंता मंगेश शेलार यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.

जायकवाडी धरणाची सध्याची पाणीपातळी १५१४.९० फूट (४६१.७१७ मीटर) इतकी आहे. धरणाची पूर्ण जलसाठा पातळी (एफआरएल) १५२२ फूट असून, सध्या धरणात एकूण ७५.४८ टीएमसी (२,१३०.३८६ दलघमी) पाणीसाठा आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता १०२.७३ टीएमसी, तर उपयुक्त जिवंत साठवण क्षमता ७६.६७ टीएमसी आहे.

मागील काही तासांत जायकवाडी धरणात ३५ हजार ५५१ क्यूसेक वेगाने आवक येथील जायकवाडी धरणात सुरू आहे. यामुळे अवघ्या चार तासांत सुमारे ०.६१ टीएमसी (१७.२१५ दलघमी) पाण्याची भर धरणात पडत आहे. अहिल्यानगर विभागातील भंडारदरा, निळवंडे, आढळा, ओझर वेअर तसेच नाशिक विभागातील गंगापूर, कडवा, दारणा, होळकर पूल आदी धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, येथील धरणात येणाऱ्या वाढत्या पाण्याची आवक लक्षात घेता पाटबंधारे विभागाचे विशेष कर्मचाऱ्यांचे देखरेख पथक स्थापन करण्यात आले आहे.

Jayakwadi dam water level
Crime News : बौद्ध लेणी परिसरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासह पाच जणांवर टोळक्याचा हल्ला

वरील धरणांमधील विसर्ग (क्यूसेकमध्ये)

जायकवाडी धरणाच्या वरील भागातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये नांदूर-मधमेश्वर वेअरमधून २५,९२५ क्यूसेक पाण्याचा सर्वाधिक विसर्ग होत आहे. याव्यतिरिक्त गंगापूर धरणातून ६,९४६, कडवा २,३१९, भावली ५८८, पालखेड ७२२, ओझरखेड ८७२, दारणा २,६३६; तर होळकर पुलावरून ६,००५ क्यूसेक प्रवाह कायम आहे.

Jayakwadi dam water level
Parbhani Somnath Suryawanshi death case|पोलिस कोठडीतील मृत्यू आता लपवता येणार नाहीत, शासनाकडून खंडपीठात सर्वंकष धोरण सादर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news