वाळूज पोलिसांनी पकडला सराईत गुन्हेगार; मुद्देमाल जप्त file photo
छत्रपती संभाजीनगर

वाळूज पोलिसांनी पकडला सराईत गुन्हेगार; मुद्देमाल जप्त

एका सराईत गुन्हेगारास वाळूज पोलिसांनी पुणे भागातील इंदापूर येथून अटक करण्यात यश मिळविले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Waluj police caught the criminal

वाळूज, पुढारी वृत्तसेवा : एका सराईत गुन्हेगारास वाळूज पोलिसांनी पुणे भागातील इंदापूर येथून अटक करण्यात यश मिळविले आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ३ लाख ७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपीने एकूण ९ गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. राहुल कांताराज पवार (रा. डोमेगाव, ता. गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे.

याविषयी पोलिसांनी सांगितले की, दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास वाळूज पोलिस ठाण्याचे विशेष पथक पोनि. शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. अजय शितोळे यांचे पथक करीत होते. सदरची घरफोडी राहूल कांताराज पवार याने केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिस पथक राहूलच्या मागावर होते.

मिळालेल्या गुप्त माहीतीनुसार पथक मिरजगाव, इंदापुर पुणे आदी ठिकाणी कार्यरत होते. तपास सुरू असतांनाच पोलिसांना चकवा देत असलेला राहूल पवार हा इंदापुर परिसरात अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वाळूज पोलिस ठाण्यात आणले. तेथे पोलिस खाक्या दाखविताच आरोपीने आपले तोंड उघडून केलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

त्याच्याकडून तीन दुचाकी गाड्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. सदर आर- ोपीवर पुणे, वाळूज, बीड, इचलकरंजी, कोल्हापुर आणि अहिल्यानगर येथील पोलिस ठाण्यात एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी उपनि. अजय शितोळे, अंमलदार विजय पिंपळे, सुधाकर पाटील नितीन धुळे, सहाय्यक फौजदार दशरथ खो-सरे, सुखदेव भागडे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT