Sambhajinagar News : व्हेरॉक क्रिकेट स्पर्धा ६ डिसेंबरपासून एडीडीसीए मैदानावर  file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : व्हेरॉक क्रिकेट स्पर्धा ६ डिसेंबरपासून एडीडीसीए मैदानावर

आंतरशालेय विजेत्याला मिळणार लाखोंचे बक्षीस

पुढारी वृत्तसेवा

Verrock Cricket Tournament to be held at ADDCA Ground from December 6

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : व्हेरॉक समूहाच्या १८ व्या आंतरशालेय आणि २० व्या औद्योगिक क्रिकेट स्पर्धेला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेची घोषणा सोमवारी (दि.१९) शहरात करण्यात आली. आंतरशालेय स्पर्धेत २० निमंत्रित शाळांचे संघ, तर औद्योगिक स्पर्धेत १० औद्योगिक आणि १० बिगर औद्योगिक क्षेत्रांतील संघ सहभागी होतील. सामने एडीडीसीए मैदानावर खेळवले जातील.

आंतरशालेय विजेत्याला १.५१ लाख, उपविजेत्याला एक लाख रुपये, तर औद्योगिक विजेत्याला १.७५ लाख आणि उपविजेत्याला १.२५ लाख रुपये मिळतील. मालिकावीरांना बाइक, तर उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजांना प्रत्येकी २५ हजार रुपये दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे विजेत्यांना रकमेसोबत आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

यावेळी घोषणाप्रसंगी व्हेरॉकचे सतीश मांडे, जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव शिरीष बोराळकर, सहसचिव करण डोग्रा, कार्यकारिणी सदस्य हेमंत मुळे, निखिल मिटकर, आजीव सभासद विशाल पांडे, विशाल लोळगे, अरुण गुदगे, दीपक जोशी, मनिंद्रसिंग कानसा, सय्यद जमशीद, अक्षय गोयल, कर्मवीर लव्हेरा, असीर सिद्दीकी, दिनेश कुंटे, मच्छिंद्र जाधव, सिद्धार्थ भोंगाडे आणि राहुल टेकाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृत बिऱ्हाडे यांनी केले.

टेकाळे यांनी आभार मानले. या स्पर्धेचे प्रवेश फॉर्म सय्यद जमशीद, असीर सिद्दीकी यांच्याकडुन संघटनेच्या एन- २ येथील क्रिकेट मैदानावर वेळ सायंकाळी ५ ते ७ यावेळात घ्यावे व २५ ऑक्टोबरपूर्वी यांच्याकडेच जमा कराण्याचे आवाहान करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT