Marigolds : दसऱ्यासाठी पाच हजार क्विंटल झेंडू बाजारात

आवक वाढल्याने भाव गडगडले, सरासरी ३० रुपये किलो दर
Marigolds news
Marigolds : दसऱ्यासाठी पाच हजार क्विंटल झेंडू बाजारातfile photo
Published on: 
Updated on: 

Five thousand quintals of marigolds arrive in the market for Dussehra

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दसरा सणानिमित्ताने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी तब्बल तीन हजार ३२७क्विंटलहून अधिक फुलांची आवक झाली, तर सिटीचौक फूल बाजारात सुमारे शंभर क्विंटल झेंडू आला. आज दसऱ्याच्या दिवसी मंगळवारी आणखी दोन हजार क्विंटल झेंडूची आवक होण्याची शक्यता आहे. आवक जास्त झाल्याने सरासरी ३० रुपये किलो दराने झेंडूची विक्री सुरू होती.

Marigolds news
Sambhajinagar News : शहानूरवाडीतील 'त्या' वादग्रस्त जागेचे - पोलिस महसुली रेकॉर्ड मागविणार

झेंडूच्या फुलांना दसरा-दिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व असते. दरवर्षी या दिवशी घरांवर, दुकानांवर झेंडूंच्या फुलांची माळ लावली जाते. दुचाकी-चारचाकी वाहनांनाही झेडूंच्या फुलांचा हार घातला जातो. यंदा विजयादशमीनिमित्ताने शहरात जिल्ह्यासह जालना, बुलडाणा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, वसमत येथून झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.

सोमवारी बाजार समितीमध्ये तब्बल तीन हजार ३२७ क्विंटल झेंडूची आवक झाली. क्विंटलला सरासरी २२०० रुपयांचा भाव मिळाला. रात्री उशिरा ते मंगळवारी (दि.२०) पहाटेपर्यंत आणखी दोन हजार क्विंटल फुलांची आवक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फुलांचे भाव खाली येतील असे फूल व्यापारी हबीब शेख म्हणाले.

Marigolds news
Sambhajinagar News : कॉलेजमधील भांडण सोडवल्याचा राग; विधीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याचा चाकूने प्राणघातक हल्ला

पाऊस नसल्याने यंदा फुलांची नासाडी झाली नाही. कळी लागलेला सर्व माल चांगला खुलला. त्यामुळे दसऱ्यानिमित्त झेंडूची मोठी आवक झाली. किरकोळ बाजारात पिवळा, भगवा झेंडू २० ते ३० रुपये, मोठा झेंडू ४० रुपये दराने आणि फुलांची माळ ५० रुपये किलोप्रमाणे विक्री सुरू होती. यंदाही बाहेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचा फुलांचा माल विक्रीसाठी आणल्याने भाव घसरले आहेत. असे सिटी चौक येथील फूलविक्रेते बाबासाहेब तांबे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news