Leopard : वीरगाव - नादी शिवारात बिबट्यासह पिलांचे दर्शन  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Leopard : वीरगाव - नादी शिवारात बिबट्यासह पिलांचे दर्शन

तालुक्यातील वीरगाव- नादी शिवारातील गट क्रमांक ३० मध्ये एका तलावाच्या बाजूला उसाच्या शेताजवळ मंगळवारी सकाळी मादी बिबट्यासह पिलांचे दर्शन झाले.

पुढारी वृत्तसेवा

Veergaon - Leopard with cubs seen in Nadi Shivara

वैजापूर / वीरगाव, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वीरगाव- नादी शिवारातील गट क्रमांक ३० मध्ये एका तलावाच्या बाजूला उसाच्या शेताजवळ मंगळवारी सकाळी मादी बिबट्यासह पिलांचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांनी वनविभागाला कळवून नागरिक व पाळीव जनावरांच्या रक्षणासाठी पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

वीरगाव नादी शिवारात उसाच्या शेतात या मादी बिबट्याचे वास्तव्य असून या ठिकाणी दोन ते तीन पिल्ले ग्रामस्थांना आढळून आली आहेत. तालुक्याच्या डोंगरथडी भागात मोठया प्रमाणावर वनक्षेत्र असल्याने या भागात वन्यप्राण्यांचा नेहमी वावर असतो. मात्र मागील काही दिवसांपासून तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी असलेल्या ऊस व मकाची लागवड वाढली आहे. त्यामुळे या भागातही मोठ्या प्रमाणावर हिंस्र प्राण्यांचा वावर वाढला असून नागरिक असुरक्षित झाले आहेत. बिबट्यासह रानडुकरांचाही नागरिकांना होत आहे.

दरम्यान वनविभागाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनरक्षक ए. एम. सय्यद यांनी वन परीक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी भेट दिली. नागरिकांनी या भागात गर्दी करू नये, रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, सोबत टॉर्च बाळगावी, लहान मुलांना बाहेर पडू देऊ नये, त्यांच्या सोबत राहावे, रात्री उघड्यावर झोपू नये, अशा सूचना वन विभागाने केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT