Cattle Smuggling Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur cattle smuggling hotspot : वैजापूर तालुका बनला गोवंश तस्करी, कत्तलीचा हॉटस्पॉट

पोलिसांची ११ महिन्यांत कारवाई; १ कोटी २० लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

नितीन थोरात

वैजापूर : गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात गोवंश तस्करी आणि अवैध कत्तलीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी अशा प्रकारांचे जाळे सक्रिय असल्याची चर्चा असताना, वैजापूर पोलिसांनी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली आहे.

वैजापूर पोलिसांनी मागील ११ महिन्यांत एकूण १७ गुन्हे दाखल केले असून, या कारवायांदरम्यान तब्बल १ कोटी २० लाख ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात गोवंश वाहतूक करणारी वाहने, जिवंत जनावरे तसेच कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य यांचा समावेश आहे.

तालुक्यातील विविध भागांतून मिळणाऱ्या तक्रारींवर पोलिसांनी तत्काळ दखल घेत कारवाई सुरू ठेवली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचालींवर लक्ष केंद्रित करून सापळे रचले जात आहेत. अनेक ठिकाणी अचानक छापे टाकून तस्करीचे प्रकार उघडकीस आणण्यात आले आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

तथापि, स्थानिक नागरिकांच्या मते, या कारवाया महत्त्वाच्या असल्या तरी तस्करीचे जाळे पूर्णतः नष्ट करण्यासाठी अजून कठोर आणि सातत्यपूर्ण उपाययोजना आवश्यक आहेत. काही भागांत अजूनही रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत.

ग्रामीण भागातील दुर्गम रस्ते, कमी पोलिस बंदोबस्त आणि सीमावर्ती भागांचा गैरफायदा घेत तस्कर सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवणे, माहिती देणाऱ्या नागरिकांचे जाळे मजबूत करणे आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दरम्यान, पोलिस प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवायांमुळे अवैध कत्तल व गोवंश तस्करीच्या प्रकारांवर काही प्रमाणात आळा बसला असला, तरी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्याची मागणी जोर धरत आहे.

हे पोलिस ठाणे कारवाईत मागे..

मागील महिन्यात काही समाजसेवकांनी मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी करणारे वाहन पकडून वीरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या घटनेतून ग्रामीण भागातही अशा प्रकारांची साखळी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या पार्श्वभूमीवर अपेक्षित ती कडक आणि सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे वीरगाव पोलिसांसह शिऊर पोलिसांनी वैजापूर पोलिसांप्रमाणे धडाकेबाज मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT