आमचा हंबरडा मोर्चा नाही तर इशारा मोर्चा आहे, अशा शब्‍दांमध्‍ये उद्धव ठाकरे यांनी राज्‍य सरकारवर हल्‍लाबोल केला.  
छत्रपती संभाजीनगर

Uddhav Thackeray hambarda Morcha | खोकेवाले डोक्‍यावर बसले नसते तर मीच शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त केले असते : उद्धव ठाकरे

पूरग्रस्‍त शेतकर्‍यांना हेक्‍टरी ५० हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे

पुढारी वृत्तसेवा

Uddhav Thackeray hambarda Morcha | "प्रत्‍येक संकटात शिवसेना शेतकर्‍यांच्‍या पाठिशी आहे. कर्जमुक्‍ती होईंपर्यंत सरकारला सोडणार नाही. पूरग्रस्‍त शेतकर्‍यांना हेक्‍टरी ५० हजार रुपये मदत शेतकर्‍यांना मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत खोकेवाले डोक्‍यावर बसले नसते तर मीच कर्जमुक्‍ती केली असती. आमचा हंबरडा मोर्चा नाही तर इशारा मोर्चा आहे, अशा शब्‍दांमध्‍ये उद्धव ठाकरे यांनी राज्‍य सरकारवर हल्‍लाबोल केला.

खोके घेऊन सत्ता पाडली....

मी मुख्यमंत्री असताना शेतकर्‍यांना कर्जमुक्त करून दाखवले होते. नियमित पैसे परत फेड करणाऱ्यांना आपण ५० हजार देणार होतो मात्र मध्‍येच कोरोनाचे संकट आले त्‍यामुळे काही काही काळ पैशे देऊ शकलो न्हवत.द्यायला सुरुवात करायची होती तर यांनी खोके घेऊन सत्ता पाडली, असे सांगत हा हंबरडा मोर्चा नाही इशारा मोर्चा आहे. जर कर्जमुक्ती केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरवू, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

पंतप्रधान शेतकऱ्यांच्‍या मदतीबाबत बोलले नाहीत

आज (दि. ११) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्‍या वतीने संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर हंबरडा मोर्चा काढण्यात आला. उद्धव ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व केले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्‍य सरकारच्‍या मदतीच्‍या धोरणावर हल्‍लाबोल केला. ते म्‍हणाले की, "ज्‍यांनी ५० खोकी घेतली त्‍यांच्‍याकडे आम्‍ही पूरग्रस्‍त शेतर्‍यांना हेक्‍तरी ५० हजार रुपयांची मदत आम्‍ही त्‍यांच्‍याकडे ५० हजारु रुपये शेतकर्‍यांना द्‍यावेत अशी मागणी करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत विमानतळाच्‍या उद्‍घाटन कार्यक्रमासाठी आले. या कार्यक्रमात कोणीही शेतकर्‍यांच्‍या मदतीबाबत बोलले नाही."

शेतकर्‍यांना मदत ही फडणवीस यांच्या सरकारने मारलेली मोठी थाप

मी संभाजीनगर मधे मुख्यमंत्र्यांची होर्डिंग्ज पाहिली, शेतकरी फोटो ऐवजी सतरंज्या उचलण्याचे होते. स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेण्‍याचा हा प्रकार आहे. पूरग्रस्‍त शेतकर्‍यांसाठी आम्‍ही ३१ हजार कोटी रुपयांचे आजवरचे इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले, असे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणावीस सांगत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मारलेली सर्वात मोठी थाप आहे, हे शेतकर्‍यांसाठी इतिहासातील मोठ पॅकेज नाही, असेही उद्धव ठाकरे म्‍हणाले.

सत्तेत एक फुल आणि दोन हाफ

तिकडे सत्तेत एक फुल आणि दोन हाफ बसले आहेत. या तिघांनी शेतकऱ्याच्या हातात टरबुज दिले आहे. एकीकडे शेतकर्‍यांच्‍या जीवन उद्‍ध्‍वस्‍त झाले आहे. जमीन खरडून गेली आहे. मी एका अटीवर समर्थन करायला तयार आहे. मुख्यमंत्री यांनी जाहीर केले खरडून गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यात साडेतीन लाख पैकी फक्त एक लाख रूपये दिवाळी आधी द्या, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे

हंबरडा मोर्चापूर्वी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणावीस यांनी केलेल्‍या टीकेला उत्तर देताना ठाकरे म्‍हणाले की, शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही राजकारण करता, न्याय हक्क मागवला तर राजकारण करता म्हणतात. -मी मुख्यमंत्री असताना अभ्यास केला होता. जेव्‍हा पिक उद्‍ध्‍वस्‍त होते तेव्‍हा पिक पाहणी कशी करणार. शेतकऱ्याला एक कोंबडी दर १०० रुपये देणार का? ७ हजार रुपये मधे दुभती गाय मिळते का? पूरग्रस्‍त शेतकरी उद्‍ध्‍वस्‍त झाला आहे. आम्ही काय माती खायची का? आजचे मरण उद्यावर नको, कर्जमुक्ती झाली पाहिजे, या मागणीचा पुन्‍नरुच्‍चार त्‍यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT