Car Accident : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू file photo
छत्रपती संभाजीनगर

Car Accident : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

दुर्घटनेत कठडे तोडून कार पुलाखाली जाऊन उलटली

पुढारी वृत्तसेवा

Two-wheeler rider dies after being hit by speeding car

लासूर स्टेशन, पुढारी वृत्तसेवा भरधाव कारच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१) दुपारी चार वाजेच्या सुमारास नागपूर मुंबई मार्गावरील वसुसायगाव पुलाजवळ घडली.

छत्रपती शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चारचाकी क्रेटा कार (एम.एच. १७ डी. एस. ३९८२) संभाजीनगरवरून लासूर स्टेशनकडे येत होती. लासूर स्टेशनकडून आंबेगाववाडी येथे जाणारा मोटरसायकलने (एम. एच. २० एफ. एल. ९७८२) भास्कर अरुण माळी (२८) हा तरुण जात होता.

वसुसायगाव येथील पुलाजवळ कार व दुचाकीची जोरदार धडक झाली. धडकेत भास्कर माळी या मृत्यू झाला. लासूर स्टेशन रुग्मवाहिका चालक शिवसेना शहरप्रमुख मयूर जैस्वाल, माजी उपसरपंच गणेश व्यवहारे, सहायक फौजदार धनंजय गोंडे यांनी जखमीला छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात हलविले.

हा अपघात एवढा भीषण होता की पुलावरील लोखंडी पाईप असलेले कठडे तोडून कार पुलाखाली जाऊन उलटली होती तर कारच्या धडकेत दुचाकीचे पुढील चाक तुटून पडले होते अपघातानंतर दोन्ही वाहने पुलाखाली जाऊन पडली होती. दरम्यान, भास्कर माळी हा पोलिस पाटील ज्ञानेश्वर बनकर यांच्या जार वाटप करणाऱ्या वाहनांवर चालक म्हणून कामावर होता. पोलिस पाटील यांच्याकडे लग्न असल्याने तो कपडे घेऊन लासूरवरून येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT