Illegal sand transport : वाळूचे दोन हायवा, दोन ट्रॅक्टर पकडले File Photo
छत्रपती संभाजीनगर

Illegal sand transport : वाळूचे दोन हायवा, दोन ट्रॅक्टर पकडले

महसूल पथकाची कारवाई, दहा लाखांच्या दंडाची कार्यवाही प्रस्तावित

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Two sand trucks, two tractors seized

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : रात्री अंधाराचा फायदा घेत अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन हायवा व दोन ट्रॅक्टर पकडून जप्त करण्यात आले. या कारवाया महसूलच्या पथकाने गुरुवारी (दि.१७) रात्री व शुक्रवारी (दि. १८) पहाटे तालुक्यातील सिसारखेडा, कायगाव व शहरातील छत्रपती संभाजीनगर नाक्यावर वेगवेगळ्या वेळेत केल्या. या कारवायांमध्ये वाळूने भरलेले दोन हायवा, दोन ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे. तर या कारवायांमुळे वाळू तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

ट्रॅक्टर मालक भास्कर सुरे, गोपाल राऊत दोघे रा. सिसारखेडा, हायवा मालक अशपाक पटेल रा. छत्रपती संभाजीनगर, हकीम पटेल रा. केहऱ्हाळा या चार जणांविर ोधात दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. तालुक्यात गौण खनिजची चोरी रोखण्यासाठी महसूलचे पथक गस्त घालत होते.

या दरम्यान रात्री सातच्या सुमारास सिसारखेडा शिव रारात दोन ट्रॅक्टर विनापासिंग असलेले अवैध वाळू वाहतूक करताना मिळून आले. पथकातील कर्मचाऱ्यांनी जप्त करीत तहसील कार्यालयात आणले. यानंतर शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास कायगाव येथे वाळूने भरलेला एक हायवा पकडून जप्त केला. तर सकाळी पुन्हा सात वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती संभाजीनगर नाक्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा (एमएच २०, ईएल- ४११५) पकडून जप्त केला.

तालुक्यातील पिंपळगाव पेठ, बोरगाव कासारी, धानोरा, सिसारखेडा, केहऱ्हाळा येथील पूर्णा नदीतून भरदिवसा अवैद्य वाळू वाहतूक सुरू होती. यात वाळू तस्करांनी नदीची चाळणी केली असून, वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा केलेला आहे. काही ठिकाणी तर रस्त्यांच्या कडेला वाळू साठा आहे. वाळू तस्करांमध्ये एवढे बळ कोठून येते ? असा प्रश्न वाळूचा साठा पाहून नक्कीच निर्माण होतो. तर या अवैध वाळू वाहतुकीमुळे महसूल विभागही बदनाम होत आहे. यात कुणाचे हात ओले आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे.

दरम्यान या प्रकरणी दोन ट्रॅक्टर मालकांवर प्रतिट्रॅक्टर एक ब्रास वाळू प्रमाणे १ लाख ३९ हजार ६०० असा एकूण २ लाख ७९ हजार २०० रुपये, दोन हायवा मालकांवर प्रति ५ ब्रास वाळू प्रमाणे ३ लाख ६२ हजार असा एकूण ७ लाख २४ हजार, असा पकडलेल्या चार वाहन मालकांवर एकूण १० लाख ३ हजार २०० रुपयांची दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.

पंटरांना चकमा

वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या वेळेत या कारवाया तहसीलदार सतीश सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी रवींद्र राजपूत, ग्राम महसूल अधिकारी विष्णू गवळ, गणेश फरकाडे, महसूल सेवक गजानन पिंगळकर, चालक बालाजी गायकवाड, सुरक्षा रक्षक पांडुरंग मोरे, शेख कलाम यांनी केल्या. विशेष म्हणजे वाळू तस्करांनी रस्त्यांच्या मुख्य ठिकाणी पाळत ठेवण्यासाठी पंटर ठेवलेले आहेत, मात्र वाळू तस्करांच्या पाळत ठेवणाऱ्या पंटरांना चकमा देत महसूलच्या पथकाने ही कामगिरी बजावली, हे विशेप.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT