

Marking will be done for the roads within the limits of the authority
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेप्रमाणेच आता महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात भविष्यातील विकासाचे नियोजन करण्यासाठी प्रमुख रस्त्यांचे सीमांकन करण्यात येत आहे. यंत्रणांच्या मालकीच्या जागेत रस्त्यात येणारी बांधकामे अतिक्रमित समजण्यात येऊन निष्कासित करण्यात येणार आहेत. संबंधित यंत्रणांना सीमांकनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात आठवड्याभरापासून रस्त्यांच्या सीमांकनाची कार्यवाही संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या सीमांकनांच्या कार्यवाहीबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत प्राधिकरण क्षेत्रातील प्रमुख रस्त्यांची शासन नियमात नमूद केलेल्या इमारत रेषा व नियंत्रण रेषा यांचे सीमांकन करण्याची कार्यवाही संबंधित यंत्रणा जसे की, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जागतिक बैंक, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर यंत्रणाकडून सुरू आहे.
शासनाने प्रत्येक रस्त्याच्या प्रकारानुसार इमारत रेषा व नियंत्रण रेषा रस्त्याच्या मध्यापासून किती अंतरावर असाव्यात या बाबतची नियमावली मंजूर केलेली आहे. सद्यस्थितीत अशा जागा हद्द फक्त नागरिकांना अवगत व्हावे म्हणून सीमांकित करण्यात येत आहेत. यंत्रणांच्या मालकीच्या जागेत रस्त्यात येणारी तात्पुरते पक्की बांधकामे अतिक्रमित समजण्यात येतील व तो संबंधित विभागाकडून निष्कासित करण्यास पात्र ठरतील.
नियंत्रण इमारत रेषेच्या आतमध्ये येणारी व संबंधित विभागाकडून परवानगी न घेता केलेली बांधकामे ही अनधिकृत समजण्यात येतोल, अशी अनधिकृत बांधकामे निर्मूलनाबाबत तूर्त कार्यवाही करण्यात येणार नाही. मात्र भविष्यातील विकासाचे नियोजन करण्यासाठी सीमांकन करण्यात येत आहे. तसेच बांधकामाबाबत भविष्यात होणारी नागरिकांची फसवणूक व आर्थिक हानी टाळण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन व बांधकाम परवानगी घेऊनच बांधकामे करावीत. तसेच संबंधित यंत्रणांना सीमांकनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
2 केम्ब्रीज शाळा ते करमाड गाव (जालना रोड)
बाळापूर गाव ते पांढरी गाव (धुळे-सोलापूर रस्ता व बीड बायपास)
गेवराई ते कौंडगाव (पैठण रस्ता)
छावणी हद्द ते रहिमपूर (छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्ता)
ए. एस. क्लब चौक ते रांजणगाव पोळ (घोटी रस्ता)
7 करोडी ते पाचपीरवाडी (धुळे-सोलापूर रस्ता)
ओहर ते ममनापूर (जटवाडा रस्ता)
सावंगी तलाव ते बिल्डा (जळगाव रस्ता)
10 सावंगी ते केम्ब्रीज शाळा राज्य महामार्ग