Accident News : दोन कार - मोटारसायकलचा विचित्र अपघात, ८ जण जखमी File Photo
छत्रपती संभाजीनगर

Accident News : दोन कार - मोटारसायकलचा विचित्र अपघात, ८ जण जखमी

वैजापूर गंगापूर रोडवरील जाकमाथावाडी शिवारात शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास दोन कार आणि मोटारसायकलचा विचित्र अपघात झाला.

पुढारी वृत्तसेवा

Two cars - motorcycle accident, 8 injured

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर गंगापूर रोडवरील जाकमाथावाडी शिवारात शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास दोन कार आणि मोटारसायकलचा झालेल्या विचित्र अपघातात आठ जण जखमी झाले. धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही कारचे अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.

वैजापूरकडून गंगापूरकडे जात असलेल्या कार (क्र. एमएच ०६ एझेड ७७७०) येत असताना समोरून ओव्हरटेक करत आलेल्या कार (क्र. एमएच ०४ डीएन ७१७४) जोरदार धडक दिली. अपघाताच्या तीव्रतेमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, वैजापूरहून येत असलेल्या मोटारसायकलने (क्र. एमएच २० डीएक्स २४४९) अपघात टळावा म्हणून ब्रेक मारताच तिचे नियंत्रण सुटले आणि कारला जाऊन धडकली. यात मोटारसायकलवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले.

अमरसिंग भय्यासिंग बगेल (६०), विजया अमरसिंग बगेल (५५), सौरभअमरसिंग बगेल (२८) ड्डू सर्व रहिवासी पीडब्ल्यूडी वसाहत, गंगापूर. बिलाल इकबाल पठाण (२०), फैजल अन्सार शहा (२९), मुस्तकीन बाबू शहा (२३) ड्डू तिघेही रहिवासी गंगापूर. दादासाहेब मारुती साळुंके (६३), मीनाबाई दादासाहेब साळुंके (५८) ड्डू दोघेही रा. सिरसगाव, ता. वैजापूर. अशी जखमींची नावे आहेत. घटनेनंतर सर्व जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे हलवण्यात आले. तेथे डॉ. चव्हाण, डॉ. आसेफा आणि डॉ. वालतुरे यांनी प्राथमिक उपचार केले. त्यापैकी पाच जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले असून उर्वरित तिघांवर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT