Accident News : वेरूळ घाटात दोन बसची धडक; चार प्रवासी जखमी file photo
छत्रपती संभाजीनगर

Accident News : वेरूळ घाटात दोन बसची धडक; चार प्रवासी जखमी

तालुक्यातील वेरूळ घाटात गुरुवारी (दि. ४) पहाटे शहर बस आणि लक्झरी पर्यटक बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन चार प्रवासी जखमी झाले.

पुढारी वृत्तसेवा

Two buses collide in Verul Ghat; four passengers injured

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वेरूळ घाटात गुरुवारी (दि. ४) पहाटे शहर बस आणि लक्झरी पर्यटक बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन चार प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून, लक्झरी बसमधील सर्व ४५ पर्यटक सुखरूप आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर-वेरूळ मार्गावरील शहर बस (एमएच २० ईएल-२८०७) वेरूळहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. त्याचवेळी खुलताबादकडून वेरुळच्या दिशेने येणारी कर्नाटक राज्यातील पर्यटकांना घेऊन जाणारी लक्झरी बस (एआर ०६ बी-७१८५) वेरूळ घाटात समोरून येत होती. घाटातील वळ-णावर दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडकेनंतर शहर बस काही अंतर घसरत गेली.

या बसमध्ये मोजकेच चार प्रवासी होते. अपघातात हे चारही प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, लक्झरी बसमधील ४५ पर्यटकांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

मात्र बस चालक संतोष अप्पासाहेब बोरगले (रा. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) यांना किरकोळ मार लागला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामुळे काही काळ वेरूळ घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT