Allergy : प्रत्येक शंभर मागे वीस जणांना ॲलर्जीचा त्रास File Photo
छत्रपती संभाजीनगर

Allergy : प्रत्येक शंभर मागे वीस जणांना ॲलर्जीचा त्रास

तज्ज्ञ म्हणतात : कारणे समजून काळजीसोबतच औषधोउपचारही महत्त्वाचे

पुढारी वृत्तसेवा

Twenty out of every hundred people suffer from allergy

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर: वाढत्या प्रदूषणासोबतच धूळीची अॅलर्जी असणाऱ्यांची संख्या कमी नाही. अनेकांना काही खाद्यपदार्थांची अॅलर्जी असते. काहींना त्व-चेची आणि औषधींचीही अॅलर्जी होते. जवळपास प्रत्येक शंभर जणांमागे वीस जणांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अलर्जीचा त्रास असतोच, असे तज्ज्ञांनी सांगितले. अॅ लर्जीची कारणे समजून त्यानुसार काळजी घेणे आणि उपचारही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तथा त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुपम टाकळकर म्हणाले, सध्या परफ्युम, डिओडरंट आणि सुगंधी सौंदर्यप्रस-घिनांच्या वाढलेल्या वापरामुळे अॅलर्जिक त्वचारोगांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. त्वचेला थेट परफ्युम लागल्यावर किंवा सूर्यप्रकाशात गेल्यास अॅलर्जी होणे. सुंगधित वास घेतल्यानंतर सर्दी, शिंका, श्वास घेताना त्रास होतो.

क्वचित, काही लोकांना परफ्युमचे घटक शोषले गेले तर शरीरभर चट्टे, सूज, चक्कर, उलटी असे लक्षणे होतात. वातावरण बदल शिंका, नाकातून पाणी येणे तर, धुळीमुळे खोकला, श्वास घेण्याचा त्रास होतो. काही खाद्यपदार्थ आणि औषधीमुळे त्वचेला खाज येणे, पित्ताच्या गाठी, चेहऱ्यावर सूज येते. तसेच मधमाशा किंवा किटकाच्या चाव्यामुळे अॅलर्जी होऊन गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे धूळ, प्रदूषणापासून बचावासाठी मास्क किंवा हेल्मेट वापरावे. परफ्युम, अॅलर्जिक फूड खाणे टाळावे. अॅलर्जीवर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे लागतात.

ॲलर्जीचे सौम्य ते गंभीर परिणाम

धुळीची ॲलर्जी सामान्य आहे. वातावरण बदल, अगरबत्ती, परफ्युम तसेच फुड आणि औषधींमुळेही अनेकांना अॅलर्जी होते. त्वचा लाल होणे, खाज येणे. पित्त यासह दमा आणि अचानक रक्तदाब कमी होतो. त्यामुळे दाखल करून औषधोपचार करावे लागतात.
- डॉ. समिध पटेल, श्वसनविकार तज्ज्ञ, मेडिकव्हर हॉस्पिटल

२० टक्के लोकांना असते ॲलर्जी

अॅलर्जीचे मुख्यतः बाहेरची म्हणजे धूळ, प्रदूषण, परागकण, | परफ्यूमची तसेच काही खाद्यपदार्थाची असते. मात्र, बहुतांश जणांमध्ये अॅलर्जिक त्वचारोग आढळतो. सुमारे १५ ते २० टक्के लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची अॅलर्जी असते. काळजी घेण्यासोबतच अॅलर्जीवर त्वच-ारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
डॉ. अनुपम टाकळकर, त्वचारोग तज्ज.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT