

वैजापूर : ठाकरे गटाचे नेते व माजी उपनगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते अकील शेख यांनी उद्धव ठाकरेंनेच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गटात) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला. ते आज (दि.८) मुंबईत अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेश करणार आहेत.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत दोन्ही ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडला. असे असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाहीये. कारण, वैजापूरमधील ठाकरे गटाचे माजी उपनगराध्यक्ष शेख हाजी अकिल शेठ हे आज (मंगळवारी) शेकडो समर्थकांसह अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. अकिल शेख हे वैजापूरच्या राजकारणात एक सक्रीय नाव असून २०१९ च्या निवडणुकीत ते वंचित आघाडीचे उमेदवार होते तर तीन नंबरचे मते त्यांना मिळाले होते. २०२४ च्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केला होता. त्यांचे चिरंजीव देखील माजी नगरसेवक असून ते देखील उद्या पक्षप्रवेश करणार आहेत.