Sambhajinagar Encroachment Campaign : मनपा पथकावर जमावाची दगडफेक, धक्काबुक्की

दिल्लीगेट रस्ता : बेकायदा २४५ बांधकामे भुईसपाट
Sambhajinagar Encroachment Campaign
Sambhajinagar Encroachment Campaign : मनपा पथकावर जमावाची दगडफेक, धक्काबुक्कीFile Photo
Published on
Updated on

Crowd throws stones at Municipal Corporation team

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेने दिल्लीगेट ते हसूल मध्यवर्ती कारागृहापर्यंतचा रस्ता नवीन विकास आराखड्यानुसार ३५ मीटर रुंद करणार आहे. त्यासाठी सोमवारी (दि.७) महापालिकेच्या पथकाने दिल्लीगेट वेधून चाधित मालमत्ता पाडापाडीला सुरुवात केली. मात्र मोहीम सुरू होताच ज्यूस सेंटर आणि चारचेरीयन जोमजवळ जमावाने महापालिकेच्या पथकाला धक्काबुक्की केली, तर एकाने दगड भिरकावला. यात एक कर्मचारी थोडक्यात बचावला. मात्र त्यानंतर एका तासात घटनास्थळावर पोलिसांची जादा कुमक येताब पथकाने बेधडक पाडापाडी सुरू केली. सायंकाळपर्यंत २४५ बांधकामे भुईसपाट केली.

Sambhajinagar Encroachment Campaign
Vaijapur News : गावागावांत परप्रांतीयांचे लोढे, वैजापूर पोलिसांत झिरो नोंद

महापालिका व पोलिस विभागाच्या पथकाने सोमवारी दिल्लीगेट ते हर्सल वा रस्त्यावर ३५ मीटर रुंदीतील बेकायदा बांधकामे पाडण्यास सुरुवात फेली. सकाळी १० वाजता पथक दिल्लीगेटवर धडकले. त्यानंतर ११ वाजता कारवाईला सुरुवात केली. दिल्लीगेटलगत एक ज्यूस सेंटरचे शेड पाडल्यानंतर पथक बारबेरीयन पाऊवर जिमसमोर आले. तेव्हा पथकाला काहींनी विरोध केला. आमच्याकडे परवानगी असल्याची बतावणीही केली. परंतु अतिरिक्त आयुक्त संतोष बाहुळे यांनी कागदपत्रे दाखवण्याची सूबना केली. तेव्हा एकानेही कागदपत्रे दाखविली नाही. यामुळे पाडापाडीला सुरुवात केली. यात बारबेरीयनलगतच्या हटिलवर हातोडा मारताच जमाव महापालिका पथकाच्या अंगावर धावून आला.

या जमावाने पथकाला चक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. एकाने जेपीबीचालकाच्या दिशेने दगड भिरकावला. सुदैवाने तो दगड त्या चालकालय लागला नाही नसता ते गंभीर जखमी झाले असते. या घटनेनंतर महापालिकेने कारवाई काही वेळेसाठी थांबविली. तसेच अतिरिक्त आयुक्त वाहुळे यांनी घटनेची माहिती महापालिका आयुक्त जी. श्रीकांत घांना दिली. त्यानंतर आयुक्तांनी पोलिस आयुक्तांशी संवाद साधत जास्तीची कुमक पाठवण्याची सूचना केली. त्यानंतर काही वेळेतच २०० पोलिसांचा ताफा दिल्लीगेटवर धडकला. जास्तीची कुमक आल्यानंतर लागलीच पाडापाडीला सुरुवात झाली, मग महापालिकेच्या पथकाने बेधडकपणे पाडापाडी करून उंच इमारती भुईसपाट करण्यास सुरुवात केली.

Sambhajinagar Encroachment Campaign
Sambhajinagar Politcs: ठाकरे गटाला दणका; मराठवाड्यातील बडा नेता अजित पवारांच्या पक्षात करणार प्रवेश

बारबेरीयनने १० लाख भरताच सूट

दिल्लीगेट येथील बारबेरीयन पॉवर जिमधारकाने गुंठेवारीसाठी १० लाखांचा धनादेश देताच प्रशासनाने ही इमारत पाहाण्यास ब्रेक दिला. तसेच संबंधितास गुंठेवारी करून घेणे आणि रस्त्यातील बाधित क्षेत्र स्वतःहून पाडणे, असे आदेशही दिले, मात्र हा प्रकार म्हणजे कारवाईमध्ये भेदभाव, असे म्हणत काहींनी संताप व्यक्त केला. तर या जिममध्ये पोलिसांसह मनपाचे काही अधिकारी व्यायाम करण्यासाठी येतात, त्यामुळे सूट दिल्याची चर्चा आहे.

परवानगी असूनही बांधकाम पाडले

महापालिकेने जुन्या विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद रस्त्याची जागा वगळून सलीम अली सरोवरालगतच्या सोसायटीतील मालमत्ताधारकांना बाधकाम परवानगी दिली आहे. मात्र असे असतानाही या सोसायटीसह तेथून पुढे सिडकोच्या हद्दीत येणाऱ्या एन-१३ परिसरातही पाडापाडी केली. नवीन विकास आराखडा हा ३५ मीटर रुंदीचा आहे. परंतु त्यानुसार भूसंपादन करून कारवाई अपेक्षित होती, असे काही मालमत्ताधारकांनी सांगितले.

परिसराला छावणीचे स्वरूप

शहरात मागील महिनाभरापासून बेकायदा बांधकामे पाडण्यची मोहीम सुरू आहे. यात मनपा व पोलिसांनी चार रस्त्यांवरील बेकायदा बांधकामे पाडली. यात कुठेही धक्काबुक्कीच काय तर बाचाचाचीही झाली नाही. परंतु सोमवारी दिल्लीगेटवर पथकाला धक्काबुक्की करीत जमावाने दगडफेकीचा प्रयत्न केला. यामुळे जास्तीचे पोलिस मागवण्यात आल्यानंतर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

रस्ता ३० मी.चा की ३५ मी.चा

महापालिकेने नवीन विकास आराखड्यानुसार शहरातील पैठण रोड, जालना रोड, बीड बायपास रोड आणि दौलताबाद रोडवर रुंदीकरणातील बेकायदा बांधकामे पाडणे सुरू केले आहे. त्यानुसार दिल्लीगेट ते हसूल रस्त्यावर सोमवारी मोहीम राबवण्यात आली. यात जुन्या विकास आराखडयात हा रस्ता ३० मीटर रुंदीचा आहे. त्यानुसारच महापालिकेने काहींनी बांधकाम परवानगी दिली आहे. तर काहींचे ३० मीटर सोडून गुंठेवारी मंजूर केली आहे. यामुळेच दिल्लीगेट येथे काहींनी महापालिकेच्या पथकाला कडाडून विरोध केला. यात काहींनी परवानगी व गुंठेवारीची कागदपत्रेही दाखविली. मात्र पथकाने त्यावर बुलडोझर चालवलाच.

रुग्णवाहिकेला दिला रस्ता

महापालिका व पोलिस पथकामुळे रस्ता दोन्ही बाजूंनी बॅरिकेट्स लावून बंद केला होता. मात्र दुपारी अचानक एक रुग्णवाहिका रुग्ण घेऊन याच रस्त्याहून घाटीच्या दिशेने निघाली होती. गर्दीतून मनपा, पोलिसांनी वा रुग्णवाहिकेला रस्ता दिला.

किरमाणी-वाहुळे यांच्यात बाचाबाची

काँग्रेसचे माजी नगरसेवक इलियास किरमाणी यांचे निवासस्थान याच रस्त्यावर आहे. निवासस्थानाची संरक्षण भिंत रस्त्यामध्ये बाधित होत असल्याने पथकाने भिंतीवर जेसीबी बालविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इलियास किरमाणी संतापले, त्यांनी पथक प्रमुख अतिरिक्त आयुक्त संतोष बाहुळे यांची भेट घेत घराचे बांधकाम नियमानुसार आहे, असे सांगितले. चिंत बाधित होते. त्यामुळे काढावीच लागेल, असे बाहुळे म्हणाले. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news