Crime Against Women Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar: कॅफेत अत्याचार करून जबरदस्ती गर्भपात; प्रशिक्षणार्थी PSI वर गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhaji Nagar | छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या भीषण प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडवली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhaji Nagar

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या भीषण प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडवली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या या तरुणीचा विश्वास जिंकून तिच्यावर कॅफेमध्ये जबरदस्ती अत्याचार केल्याचा आणि त्यानंतर धमकावत जबरदस्ती गर्भपात करवून घेतल्याचा गंभीर आरोप प्रशिक्षणार्थी फौजदार भागवत ज्ञानोबा मुलगीर याच्यावर करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सध्या नाशिक अकादमीत पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रशिक्षण घेत आहे.

फिर्यादी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीशी तिचे काही महिन्यांपासून मैत्रीचे संबंध होते. त्या मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपीने तिला भेटण्याच्या बहाण्याने एका कॅफेत नेले. कॅफेत कोणी नसेल असा अंदाज घेऊन त्याने तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. या घटनेनंतर तो सतत तिला धमकावत राहिला आणि कोणाला सांगितले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे दबाव टाकला.

अत्याचारानंतर काही दिवसांनी तरुणी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. हे कळताच आरोपीने तिच्यावर मानसिक दबाव टाकून जबरदस्ती गर्भपात करवून घेतल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. एवढेच नाही, तर हा प्रकार कुणाला सांगू नये म्हणून आरोपीच्या बहिणीने आणि वडिलांनीही पीडितेला धमकावल्याचे तिने सांगितले आहे. त्यामुळे गुन्ह्यात या दोघांनाही सहआरोपी करण्यात आले आहे.

प्रकरण उघड झाल्यानंतर तरुणीने धैर्याने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. आरोपीवर बलात्कार, धमकी, जबरदस्ती गर्भपात यांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (ॲट्रॉसिटी) गुन्हे नोंदवले गेले आहेत.

या प्रकरणामुळे पोलिस अकादमीतील प्रशिक्षणार्थींच्या वर्तनाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस दलात दाखल होण्यापूर्वीच गुन्हेगारी प्रवृत्तीचे वर्तन दिसणे चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास अतिशय संवेदनशीलता आणि वेगाने केला जात आहे. पीडित तरुणीला आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तपास अधिकारी आरोपीच्या कुटुंबीयांनी केलेल्या धमक्यांचाही तपास करत आहेत. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, घटनास्थळ आणि संबंधित कॅफे परिसरातील CCTV फुटेजही मागवण्यात आले आहेत.

या भीषण प्रकरणामुळे शहरात संतापाची भावना पसरली आहे. एक पोलीस अधिकारी होऊ पाहणाऱ्या व्यक्तीकडून असा घृणास्पद कृत्य अपेक्षित नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT