Traffic Changes : अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त उद्या वाहतुकीत बदल file photo
छत्रपती संभाजीनगर

Traffic Changes : अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त उद्या वाहतुकीत बदल

भडकलगेट ते अण्णा भाऊ साठे चौक मार्ग सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत राहणार बंद

पुढारी वृत्तसेवा

Traffic changes tomorrow on the occasion of Anna Bhau Sathe Jayanti

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.१) शहरात सालाबादप्रमाणे उत्सव साजरा करण्यात येणार आहे. अण्णा भाऊ साठे चौकामध्ये मुख्य रस्त्यावर स्टेज लावून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे येथे शहरासह परिसरातून मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय अभिवादनासाठी एकत्र येतो.

यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार अण्णा भाऊ साठे चौक परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते रात्री १२ (२४.००) वाजेपर्यंत या भागातील मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या निरीक्षक रेखा लोंढे यांनी केले आहे.

असे आहेत पर्यायी मार्ग

भडकलगेटकडून येणारी वाहने जुना बाजार, सिटी चौकमार्गे पुढे जातील.

उद्धवराव पाटील चौकाकडून येणारी वाहने सत्यविष्णू हॉस्पिटल चौक, सिद्धार्थ चौक, टीव्हीसेंटरमार्गे किंवा सत्यविष्णू हॉस्पिटल चौक, एन-१२ स्वर्ग हॉटेल, टीव्हीसेंटरमार्गे ये-जा करतील.

विभागीय आयुक्त निवासस्थान टी-पॉइंटकडून येणारी वाहने चंपा चौक, चेलीपुरा चौक, सिटी चौकमार्गे वळवण्यात येतील.

एसटी बससाठी असे असतील मार्ग एसटी बस मिल कॉर्नरवरून यू-टर्न घेऊन कार्तिकी चौक, महावीर चौक, क्रांती चौक उड्डाणपुलावरून जळगाव टी-पॉइंटमार्गे धावतील. तसेच दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एसटी बस हर्मूल टी, शरद टी, जळगाव टी, महावीर चौक, कार्तिकी चौक या मार्गाचा वापर करतील.

हे मार्ग राहतील पूर्णपणे बंद

भडकलगेट ते अण्णा भाऊ साठे चौक

उद्धवराव पाटील चौक ते अण्णा भाऊ साठे चौक

विभागीय आयुक्त निवासस्थान टी-पॉइंट ते अण्णा भाऊ साठे चौक

चेलीपुरा चौक ते चांदणे चौक मार्गे अण्णा भाऊ साठे चौक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT