Sambhajinagar Rain : पावसाच्या रिपरिपीने संभाजीनगर ओलेचिंब

जनजीवन विस्कळीत, दिवसभर कोसळधारा; ३० मिमीची नोंद
Sambhajinagar Rain
Sambhajinagar Rain : पावसाच्या रिपरिपीने संभाजीनगर ओलेचिंबfile photo
Published on
Updated on

Normal life disrupted in Sambhajinagar due to rain; downpours throughout the day; 30 mm recorded

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या बरसलेल्या हलक्या, मध्यम आणि दमदार पावसाने शहर आणि ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत केले. गुरुवारी (दि.३०) दिवसभर पावसाच्या कथी मध्यम, तर कधी दमादार कोसळधारा सुरूच राहिल्या. त्यामुळे संपूर्ण जिल्हा ओलाचिंब झाल्याचे दिसून आले. गुरुवारी रात्री साडे अकरापर्यंत ३० मिमी पाऊस झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने दिली.

Sambhajinagar Rain
Abhijeet Dipke : भाजप प्रवेशाची ऑफर, आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव

जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारीही पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी भुरभुर, तर काही ठिकाणी थांबून थांबून मध्यम व दमदार सरी कोसळल्या. पाऊस क्षणाचीही उसंती न घेता सलग बरसत राहिला. त्यामुळे संपूर्ण जिल्हा ओलाचिंब झाल्याचे दिसून आले. प्रत्येक रस्त्याहून पावसाचे पाणी वाहत राहिले.

तर खड्डेमय असलेल्या रस्त्यांवर डबके साचले होते. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये हलक्या सरी कोसळल्या, तर काही भागांत पावसाचा जोर सतत कमी अधिक राहिला. या पावसामुळे कामगारांसह बच्चेकंपनीचे हाल झाले. दिवसभर संततधार सुरूच राहिल्याने संपूर्ण जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते.

Sambhajinagar Rain
Sambhajinagar News : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना मातोश्रीचे निमंत्रण

गोदाकाठच्या गावांना सकर्ततेचा इशारा नगर, नाशिकहून जिल्ह्यात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गंगापूर तालुक्यासोबतच वैजापुरातील गोदाकाठच्या काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नद्या प्रवाहित, प्रकल्पात आवक

सलग दोन दिवसांपासून पावसाची हजेरी सुरू राहिल्याने सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांमधील नद्या प्रवाहित झाल्या आहेत. सोयगाव येथील वेताळवाडी मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागला आहे. तर सोना नदी दुथडी भरून वाहत आहे. विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांची खरीप हंगामाची चिंता मिटली आहे.

शहरातही दमदार हजेरी

शहरात आठवडाभरापासून पावसाची हजेरी सुरूच आहे. त्यात बुधवारी दिवसभर हलक्या सरी कोसळल्यानंतर गुरुवारी पहाटेपासूनच मध्यम आणि दमदार सरी बरसण्यास सुरुवात झाली. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले.

भुयारी मार्गाची झाली घसरगुंडी

शहरातील शिवाजीनगर भुयारी मार्ग पावसाळ्यात पुन्हा वादात सापडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतीच या भुयारी मार्गाची दुरुस्ती केली आहे. मात्र त्यानंतरही हा मार्ग अडचणीत आला आहे. गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे मार्गाची घसरगुंडी झाली होती. अनेक दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागली. यात काहींच्या दुचाकी स्लीप झाल्या. मंडपामुळे पाण्याचा तातडीने निचरा होत होता. दुपारी अग्निशमन बंबाने पाण्याचा फवारा मारून मुयारी मार्ग स्वच्छ केला.

तालुक्यांमध्ये मुसळधार

जिल्ह्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. गंगापूर, सोयगाव, पैठण आणि वेरूळ परिसरात मध्यम स्वरूपाचा, तर कुठे मुसळधार बरसला. तसेच कन्नड तालुक्यात दिवसभर भीजपाऊस सुरू राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news