Torture camp at Vidyadeep Children's Home; Sanitary pads also checked
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा छावणीतील विद्यादीप बालगृहात आमचा छळ होतोय, खोलीमध्ये सीसीटीव्ही लावले, एकच टूथपेस्ट, छोटी साबण दिली जाते असे आरोप झाले होते. त्यानंतर आता मुलींना सॅनिटरी पॅड देतानाही पहिला पॅड वापरलाय का? याची पडताळणी केली जात होती अशी धक्कादायक बाब समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांची माहिती आणि पीडित मुलींच्या आरोपानुसार, आम्हाला येथे राहायचे नाही, आमचा छळ होतोय, असा आरोप करून पोक्सोच्या गुन्ह्यातील पाच व घरगुती कारणावरून विद्यादीप बालगृहात राहणाऱ्या चार मुलींनी पळ काढला होता. त्यांनी काचेने हाताला मारून घेतले होते. त्यात जखमीही झाल्या होत्या.
एवढा संयमाचा उद्रेक का झाला याबाबत माहिती घेतली असता न्यायालयाच्या आवारात मुलींनी मोठमोठ्याने बाल कल्याण समिती आणि विद्यादीप बालगृहावर आरोप केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मुली म्हणत होत्या की, आम्हाला तिथे राहायचे नाही.
आमच्या खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, घरच्यांशी फोनवर बोलू दिले जात नाही, एकच छोटी पेस्ट आणि छोटी साबण महिनाभर बापरण्यास सांगितले जाते. धार्मिक व जातीय द्वेषातून वाईट वागणूक मिळते. या छळाला आम्ही कंटाळलो आहेत. बाल कल्याण समितीकडे सात दिवसांपासून आम्हाला इथे राहायचे नाही, कुठेही सोडा, मुक्त करा किंवा नाशिकला ठेवा, अशी मागणी केली होती. मात्र समितीकडून बरेच दिवस प्रतिसाद मिळाला नाही.
रविवारी समिती बालगृहात येणार होती, पण कोणीही आले नसल्याने मुलींनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संयमाचा उद्रेक झाला. सोमवारी सकाळी बराच वेळ वाट पाहून त्यांनी तेथील ट्यूब लाईट फोडून नऊ मुलींनी हातावर मारून घेतले. त्यानंतर संरक्षण भिंतीवरून बाहेर उड्या घेत पलायन केले होते. या आर- ोपानंतर आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. मुलींना सॅनिटरी पॅड देताना पूर्वीचा वापरला का, याची पडताळणी केली जायची असे समोर आले आहे.