Sambhajinagar Crime : ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीने जीवन संपवले File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीने जीवन संपवले

प्लिज हे कोणाला सांगू नकोस, शेवटचे ऐक...

पुढारी वृत्तसेवा

Tired of blackmailing, a young woman ended her life

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा ऑपरेशन टेक्निशयनची प्रॅक्टिस करताना हॉस्पिटलमध्ये तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. पण तो तिला आरोपी सचिन भिसे ब्लॅकमेल करत असल्याने अखेर तरुणीने शनिवारी (दि.१९) गळफास लावून मृत्यूला कवटाळले.

प्रारंभी दीपक इंगळे (१८, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर ब्लॅकमेल करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सचिन राजू भिसे (१९, रा. बाराप-ल्ला मस्जिदसमोर, मिलकॉर्नर) याला अटक केल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी विवेक जाधव यांनी दिली.

आत्महत्येपूर्वी तरुणीने त्याला सचिन प्लिज कोणाला सांगू नको, लास्ट वेळेस ऐक, असे मेसेज विनवणी करणारे मेसेज केले होते ते तिचे शेवटचे ठरले.

फिर्यादी सुजाता दीपक इंगळे (३९, रा. भावसिंगपुरा) यांना मुलगा जीवन आणि मुलगी प्रारंभी अशी दोन अपत्य असून, त्या पतीपासून २०१५ पासून विभक्त राहतात. प्रारंभीचा ऑपरेशन टेक्निशिअनचा कोर्स झाला होता. ती समर्थनगर भागातील एका हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करीत होती. तेव्हा तिची आरोपी सचिन भिसे सोबत काम करताना जानेवारी महिन्यात ओळख झाली होती.

तेव्हापासून दोघांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरु होते. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. दोघांमध्ये एकमेकांशी फोनवर बोलणे, भेटणे सुरू होते. एक महिन्यापूर्वी प्रारंभीच्या वडिलांनी सचिनला माझ्या मुलीसोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवू नको, असे बजावले होते. तत्पूर्वी सचिनने प्रारंभी आणि तिच्या आईकडे खर्चासाठी पैसे मागितले. गाडी घेण्यासाठी २० हजारांची मागणी केली होती. तेव्हा त्याला ३ हजार रुपये नगदी दिलेही होते.

प्लिज ना सचिन, तिच्या शेवटच्या मेसेजने मन सुन्न...

प्रारंभीच्या मोबाईलची घरच्यांनी पाहणी केली. तेव्हा तिच्या स्नॅपचॅटवर आरोपी सचिन भिसेचे अनेक मिसकॉल पडले होते. पाहणी केली तेव्हा सचिनला मेसेज केले होते. त्यात तिने सचिन प्लिज सांगू नको, प्लिज सचिन ऐक ना सचिन प्लिज नको सांगू, हे प्लिज ना सचिन, मी वापस काही नाही बोलणार, परेशान नाही करणार, लास्ट चान्स दे फक्त, प्लिज एवढे लास्ट वेळेस ऐक, प्लिज प्लिज असे इंग्रजीत मेसेज केलेले निदर्शनास आले. त्यावरून त्याने तिला ब्लॅकमेल करून मानसिक त्रास दिल्याचे समोर आले. त्यावरून छावणी पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. २४) गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक गाडेकर करत आहेत.

फोनवर बोलत असताना घेतला गळफास

शनिवारी (दि.१९) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास प्रारंभी ब्युटीपार्लरसाठी निघाली होती. परंतु अचानक ती घरी परत आली. आईला म्हणाली वॉशरूमला जायचे आहे, मात्र वॉशरूमवरून घरातील दुसऱ्या खोलीत गेली. त्यावेळी ती फोनवर सचिन भिसे सोबत बोलत होती. तेव्हा तिची आईही पतीसोबत फोनवर बोलत होती. काही वेळाने तिचा भाऊ जीवन बाहेरून आला. त्याने प्रारंभी कुठे आहे, असे म्हटले. तेव्हा तिचा मामाही आलेला होता. सर्वांनी घरात शोध घेतला तेव्हा तिने खोलीतील सिलिंग फॅनला स्कार्पच्या साह्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. तिला तात्कळ घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT