Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्ष सश्रम कारावास file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्ष सश्रम कारावास

भावासोबत रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. एम. महाले यांनी तीन वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

पुढारी वृत्तसेवा

Three years of rigorous imprisonment for man who molested a minor girl

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भावासोबत रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. एम. महाले यांनी तीन वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीला विनयभंग, धमकी आणि पोक्सो कलमान्वये दाखल तीन गुन्ह्यात प्रत्येकी तीन, दोन व तीन वर्षांची शिक्षा सुनावली असली तरी या शिक्षा एकत्रितच भोगायच्या आहेत.

आनंद शेकनाथ गायकवाड (वय २६), असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी परिचारिका असलेल्या पीडितेच्या आईने जवाहरनगर पोलीस ठाण्यात २ एप्रिल २०२४ रोजी तक्रार नोंदवली होती. तक्रारीनुसार १ एप्रिल रोजी घटनेच्यावेळी १४ वर्षाची असलेली मुलगी व सातवीत शिकणारा तिचा भाऊ हा भानुदासनगरहून अरिहंतनगर येथे येत होते. यावेळी भानुदासनगरमध्ये राहणारा आनंद गायकवाड पीडितेच्या जवळ आला व त्याने विनयभंग करून माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला भेटली नाहीस तर जिवे मारीन, अशी धमकी दिली.

या प्रकारामुळे पीडितेला मानसिक धक्का बसला असून, भीतीने घरातून बाहेरही पडत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आनंदविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणी सहायक सरकारी वकील अरविंद बागुल यांनी पाच साक्षीदार तपासले. यामध्ये पीडिता व तिच्या भावाची साक्ष महत्त्वाची ठरली.

प्रकरणात तपास अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक अनुराधा पाटील यांनी काम केले. तर अंमलदार सी. एन. डेडवाल यांनी न्यायालयात तर ठाण्यासाठी ए. पी. दसरे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT