Bogus Voter Registration : बोगस मतदार नोंदणीची चौकशी करा

शिरुर प्रकरण : रा.कॉ. चे विभागीय आयुक्तांना निवेदन
Bogus Voter Registration
Bogus Voter Registration : बोगस मतदार नोंदणीची चौकशी कराfile photo
Published on: 
Updated on: 

Investigate bogus voter registration

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शिरूर शहरातील मतदार यादीत बोगस नावांचा समावेश करण्यात आले आहे. याबाबत तातडीने चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी (दि. १६) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख मेहबूब यांनी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडे केली आहे.

Bogus Voter Registration
Gangapur News : गंगापूर-खुलताबादच्या ग्रामीण आरोग्य सेवेला बूस्ट

जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेनंतर शिरूर शहरातील मतदार यादीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व मतदारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. संबंधित व्यक्ती शिरूर शहराच्या मूळ रहिवासी नसतानाही त्यांची नावे मतदार यादीत बेकायदेशीररीत्या समाविष्ट करण्यात आली आहेत.

या प्रक्रियेसाठी बोगस प्रॉपर्टी टॅक्स रेकॉर्ड (पीटीआर), बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड आणि इतर खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा वापर करण्यात आला आहे. अशा प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी करणाऱ्यांसह या गैरप्रकारात सहभागी असलेल्या सर्व संबंधित दोषींवर तातडीने कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Bogus Voter Registration
Sambhajinagar News : सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी प्रशासनाची जबाबदारी होणार निश्चित

आयुक्तांकडून चौकशीचे आश्वासन या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.