Sambhajinagar Crime : पोलिसांचा धाक संपला... एकाच दिवशी तीन महिलांचे मंगळसूत्र हिसकावले File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : पोलिसांचा धाक संपला... एकाच दिवशी तीन महिलांचे मंगळसूत्र हिसकावले

दुचाकीस्वार चोरांचा धुमाकूळ, महिलांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Three women's mangalsutra snatched in one day

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरांनी धुमाकूळ घातला असून, मंगळवारी (दि.९) एकाच दिवशी तीन ठिकाणी महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना समोर आल्या आहेत, पोलिसांचा धाक संपल्याने चोरटे निर्धास्तपणे गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या, लूटमार करत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या महिन्यात सुमारे २२ हून अधिक लुटमारीच्या घटना शहरात घडल्या. गेल्या आठ दिवसांत गणेशोत्सव काळात ८ ते १० महिलांचे मंगळसूत्र चोरांनी लंपास केले. यासोबत सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकातही प्रवासी महिलांचे दागिने चोरून नेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र पोलिसांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने चोरटे मोकाट सुटले आहेत. यामुळे महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. सीसीटीव्हीत चोरटे कैद होऊनही पोलिसांना सापडत नाहीत. त्यामुळे या घटना रोखण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत आहे.

▶ सकाळी ७ वाजता पुंडलिकनगर

पहिल्या घटनेत फिर्यादी पार्वती प्रल्हाद राठोड (७२, रा. सह्याद्रीनगर, पुंडलिकनगर रोड) या पतीसोबत सकाळी फिरायला गेल्या होत्या. सातच्या सुमारास दौलत बंगल्याच्या पाठीमागून घराकडे पायी येत असताना गल्लीमध्ये एक लाल रंगाच्या दुचाकीवर २५ ते ३० वयाचे दोन जण हेल्मेट घालून आले. त्यांनी सदर बिल्डिगचे नाव काय आहे, अशी विचारणा करून पार्वती यांच्या गळ्यातील २ तोळ्यांचे गंठण हिसकावले.

▶ सायंकाळी ७:३० वाजता गारखेडा परिसर

दुसऱ्या घटनेत फिर्यादी अर्चना चंद्रकांत शेळके (४४, रा. भगतसिंग नगर, गारखेडा परिसर) या मोपेडने जात असताना उद्योग विनायक अपार्टमेंट समोर, गारखेडा परिसरात सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पाठीमागून दुचाकीवर दोन जण आले. एकाने अर्चना यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून, अधिक तपास उपनिरीक्षक मारोती खिल्लारे करत आहेत.

▶ रात्री ७:५० वाजता शिवाजी हायस्कूलजवळ

तिसऱ्या घटनेत फिर्यादी सोनाली राहुल कोठारी (३८, रा. लालित्य नभराज अपार्टमेंट, उस्मानपुरा) या शिवाजी हायस्कूलसमोर, खोकडपुरा रस्त्याने जात असताना दुचाकीवर दोन जण पाठीमागून आले. मागे बसलेल्या चोराने सोनाली यांच्या गळ्यातील २ तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून सिल् लेखाना चौकाकडे धूम ठोकली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

क्रांती चौक पोलिसांची निष्क्रियता : पुन्हा बसस्थानकात दोघींचे मंगळसूत्र लंपास

फिर्यादी मीना मारुती कोथिंबिरे (४८, रा. बिडकीन) या बुधवारी (दि.१०) दुपारी एकच्या सुमारास घरी जाण्यासाठी मध्यवर्ती बस्थानकात आल्या. पैठण जाणाऱ्या एसटीत चढताना त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅमचे मंगळसूत्र आणि त्यांच्यासोबतच्या शांताबाई विठ्ठल कुलकर्णी (६५, रा. शहानगर, शिंदीवन) यांच्या गळ्यातील २ ग्रॅमची सोन्याची पोत गर्दीतून चोराने तोडून लंपास केली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून तपास पोलिस निरीक्षक सुनील माने करत आहेत. दरम्यान, बसस्थानकातील पोलिस चौकी शोभेची वस्तू बनली आहे ? गेल्या काही दिवसांत मोठ्याप्रमाणात दागिने चोरीच्या घटना घडूनही चोरांना पकडण्यात क्रांती पोलिसांना काडीचा इंटरेस्ट नसल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT