Chhatrapati Sambhajinagar Crime News : व्यवस्थापकाच्या घरावर ५ महिन्यांत दुसऱ्यांदा चोरांचा डल्ला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime News : व्यवस्थापकाच्या घरावर ५ महिन्यांत दुसऱ्यांदा चोरांचा डल्ला

साडेसात तोळ्यांचे दागिने, रोख लंपास; गुरुसाहनी नगरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

Thieves break into manager's house for second time in 5 months

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

बाहेरगावी गेलेल्या खासगी कंपनीतील व्यवस्थापकाचे घर फोडून चोराने ३ लाख २७हजारांचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. ही घटना ५ ते ११ जून दरम्यान धरती धन प्लाझा, गुरूसाहनी नगर येथे घडली. विशेष म्हणजे पाच महिन्यातच या घरात चोरीची ही दुसरी घटना आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी रितेश कृष्णमूर्ती देवेंद्रम (२८, रा. मापारी धरतीधन प्लाझा, गुरुसहानी नगर) हे ७ स्टार एमसीएन कंपनीत व्यवस्थापक आहेत. त्यांचे मूळ गाव मुंबई आहे. ६ जून रोजी ते कुटुंबीयांसह मुंबई येथे गेले होते. ही संधी साधून चोराने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून २२ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, १५ ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस, २३ ग्रॅमची चैन, २० ग्रॅमची सोन्याची चैन आणि ६२ हजारांची रोख रक्कम असा ३ लाख २७ हजारांचा ऐवज लंपास केला.

दरम्यान, देवेंद्रम यांनी घराला लावलेल्या सीसीटीव्हीचे कॅमेरे त्यांच्या मोबाईलला जोडलेले आहेत. ते मुंबईत असताना दररोज कॅमेरे चेक करत होते. ९ जून रोजी त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलली असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घर मालक विशाल बागल याना फोन करून घरी जाऊन बघण्यास सांगितले.

बागल यांनी जाऊन पहिले तेव्हा मेन गेटला कुलूप नव्हते. दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरात सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घटनेची माहिती पुंडलिकनगर देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ११ जून रोजी सकाळी देवेंद्रम हे मुंबईहुन सकाळी पाच वाजता परतले. घरातील दागिने, रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद

देवेंद्रम यांच्या याच घरात डिसेंबर २०२४ मध्ये चोरी झाली होती. त्यावेळी देखील ४४ हजारांची रोकड, दागिन्यांसह २ लाख ९३ हजाराचा ऐवज लंपास केला होता. तेव्हादेखील ते मुंबईलाच गेले होते. त्यामुळे जवळचेच कोणीतरी असतील असा पोलिसांचा अंदाज आहे. सीसीटीव्हीत दोन चोरटे कैद झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याचे तपास अधिकारी एपीआय शिवप्रसाद कन्हाळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT