Money Rain Racket : पैशांच्या पावसासाठी जादूटोणा करणारे त्रिकुट गजाआड

हॉटेल रविराजमध्ये गुन्हे शाखेचा छापा; साहित्य जप्त
Money Rain Racket
Money Rain Racket : पैशांच्या पावसासाठी जादूटोणा करणारे त्रिकुट गजाआडFile Photo
Published on
Updated on

Three arrested for practicing witchcraft for rain of money

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

लॉकडाऊनमध्ये कंगाल झालेल्या व्यावसायिकाने दोन मांत्रिकांना पैसे देऊन हॉटेलमधील खोलीत मंत्रतंत्र विद्या करत पूजा मांडली. मात्र, पैशाचा पाऊस पाडून पैसे दुप्पट करण्यासाठी घातलेला घाट गुन्हे शाखेच्या पथकाने उधळून लावला. ही कारवाई बुधवारी (दि.११) सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत बाबा पेट्रोल पंप परिसरातील हॉटेल रविराज येथे करण्यात आली.

Money Rain Racket
Santosh Ladda robbery case : अमोल खोतकरने नांदेड, तेलंगणा, आंध्रप्रदेशात लावली सोन्याची विल्हेवाट

व्यावसायिक विकास प्रकाश उत्तरवार (४२, रा. खडकी बाजार, ता. हिमायतनगर, नांदेड) याच्यासह विलास देवराव कुहीले (४२, रा. जरूळ, ता. वैजापूर) आणि शंकर बबनराव काजळे (३६, रा. चिकलठाणा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

अधिक माहितीनुसार, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांना हॉटेल रविराज येथील खोली क्र. ३१० व १२४ मध्ये काही इसम जादूटोणा करून नकली नोटा चलनात आणण्यासाठी थांवले असल्याची माहिती मिळाली होती.

Money Rain Racket
Chhatrapati Sambhajinagar News : प्रभाग रचना रद्द करण्यासाठी खंडपीठात याचिका दाखल

त्यांनी सहायक निरीक्षक काशिनाथ महांडुळे यांच्या कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार, बुधवारी महांडुळे यांच्यासह अंमलदार शिंदे, शेख, भानुसे, उमेश आहोळे, शुभम सोनवणे, अक्षय आवारे यांनी हॉटेल रविराजमध्ये दोन पंप घेऊन छापा मारला. उत्तरवारसह खोलीत कुहीले, काजळे जादूटोणा करताना आढळून आले. पोलिसांनी सर्व खोलीची झडती घेतली. तेव्हा तीन वाळलेले लिंबू, कापूर, दोन नारळ, शेंदूर, काळी पावडर, पांढऱ्या कवडघा, लाला कपडा, ४८ कौरबॅगमध्ये औषधी वनस्पती, १४०० रुपयांची रोकड, तीन मोबाईल, २२०० रुपये रोख, २०० रुपयांच्या २० नकली नोटा असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ब्रेड पीएसआय धर्मेंद्र शिंदे करत आहेत.

पाच महिन्यांपासून हॉटेलात मुक्कामी

आरोपी विकास उत्तरवारने २९ डिसेंबर २०२४ पासून हॉटेल रविराज येथील खोली क्र. ३१० ही आरक्षित केलेली होती. तेव्हापासून तो तिथेच राहत होता. त्यानंतर त्याने पुणे येथील मित्र सचिन रामचंद्र बराटे (रा. वारजे, पुणे) याच्या नावावर १८ एप्रिल रोजीपासून खोली क्र. ३१४ देखील आरक्षित करून तेजलेली होती.

कर्जबाजारी झाल्याने लागला नादी

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी विकास उत्तरवार याची पुण्यात कंपनी होती. तो एमबीए झालेला आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये त्याची कंपनी बंद पडल्याने तो कर्जबाजारी झाला. मित्रांकडून कर्ज घेतल्याने त्यांना चेक देऊ लागला पण पैसे नव्हते. त्यानंतर दोन जादूटोणा करणाऱ्यांच्या नादी लागला. त्याने ५ चे दहा कोटी करण्यासाठी हा घाट घातला होता असे देखील समोर आले आहे. छावणी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध अशाच स्वरूपाचा एक गुन्हा नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लाख कोटीच्या रकमा लिहिलेले चेक

उत्तरवारकडे खोलीत चेक बुक, काहींवर नावे तर काहींवर विना तारीख लाख कोटी रुपयांच्या रकमा लिहिलेले २०२९ पासूनचे जुने चेक आढळून आले. जवळपास ८ ते ९ चेक पोलिसांनी जप्त केले आहेत. यामध्ये अनेक चेक हे पुणे येथील व्यक्तींच्या नावे देण्यात आल्याचे दिसून येत आहे. आरोपी कुहीले आणि काजळे हे दोघे जादूटोण्याने रोख रक्कम दुप्पट-तिप्पट करून देतात असे उत्तरवारने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी जप्त केलेल्या कागदावर मंत्र लिहिलेले आहेत. दररोज सकाळी अंघोळ करून पाच दिवस रोज मंत्र जप करणे, मणी दुधामध्ये बुडवून ठेवावा. जप झाल्यानंतर दूध झाडाला सोडून द्यावे असे लिहिलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news