Sambhajinagar News : एसटी कर्मचाऱ्यांच्या सजगतेने वाचवले दोन लहान मुलांचे भविष्य  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : एसटी कर्मचाऱ्यांच्या सजगतेने वाचवले दोन लहान मुलांचे भविष्य

संभाजीनगर बसस्थानक ठरले मदतीचे केंद्र : मानवी कृतीमुळे दोन कुटुंबांना मिळाला दिलासा

पुढारी वृत्तसेवा

The vigilance of ST employees saved the future of two young children

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा संकटाक्षणी माणुसकी जिवंत ठेवणारी हृदयस्पर्शी घटना सोमवारी (दि.११) छत्रपती संभाजीनगर मुख्य बसस्थानकात समोर आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे दोन शाळकरी मुलांचे आयुष्य धोक्यात येण्यापासून वाचले, नेवासा येथील बोर्डिंग स्कूलमधून कोणालाही न सांगता प्रवासाला निघालेल्या इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांना मध्यवर्ती बसस्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांनी वेळीच ओळखून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्या या मानवी कृतीमुळे दोन कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

तारकपूर आगाराची नेवासा संभाजीनगर या मार्गावरील एसटी बस नेहमीप्रमाणे सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकात दाखल झाली. त्या बसमध्ये वाहक म्हणून कार्यरत सोनाली शिंदे यांनी दोन लहान मुले एकटी बसलेल्या अवस्थेत पाहिली. या बालकांच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता. संशय आल्याने शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

त्यावेळी दोघेही नेवासा येथील एका बोर्डिंग स्कूलचे विद्यार्थी असल्याचे समोर आले. तसेच ते कोणालाही न सांगता प्रवासास निघाले असल्याचे त्यांनी कबूल केले. मात्र त्यांच्या पालकांचा मोबाईल क्रमांक किंवा पत्ता सांगता येत नव्हता. मात्र ते जाफराबादचे रहिवासी आहेत, केवळ एवढीच माहिती मिळाली.

त्यावेळी त्यांची अवस्था पाहून शिंदे यांनी तात्काळ चौकशी कक्षात जाऊन वरिष्ठांना माहिती दिली. त्यावेळी बसस्थानकावरील चौकशी कक्षातील वाहतूक नियंत्रक लांडगे आणि जाकीरभाई यांना शिंदे यांनी सर्व माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बरिष्ठ नियंत्रक सय्यद नजीब यांनी तात्काळ पोलिसांना कळवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या तात्परतेमुळे काही मिनिटांतच पोलिस पथक बसस्थानकात दाखल झाले आणि मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

मुलांचा सुखरूप ताबा

बसस्थानक पोलिस चौकीतील जमादार देशमुख यांनीही माहिती मिळताच त्वरित जालना-जाफराबाद पोलिस कंट्रोल रूमशी संपर्क साधला. मुलांना पुढील सुरक्षिततेसाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. क्रांती चौक पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून मुलांच्या पालकांचा शोध लावला, पालकांच्या विनंतीनुसार, दोन्ही मुलांना छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT