Marathwada University : उन्हाळी परीक्षांसाठी विद्यापीठाची तयारी File Photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada University : उन्हाळी परीक्षांसाठी विद्यापीठाची तयारी

उत्तरपत्रिका मूल्यमापन, निकाल प्रक्रियेबाबत सूचना

पुढारी वृत्तसेवा

The University's Preparations for Summer Examinations

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने मार्च/एप्रिल २०२६ मध्ये होणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालक आणि जिल्हा समन्वयकांची बुधवारी (दि. १३) ऑनलाइन बैठक घेऊन परीक्षा प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. ही बैठक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी.एन. डोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी सर्व महाविद्यालयांनी उत्तरपत्रिका मूल्यमापनासाठी शिक्षकांची कार्यमुक्ती करून त्याबाबतचा अहवाल विद्यापीठास सादर करावे, उत्तरपत्रिका तपासणीस अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांची माहिती विद्यापीठाकडे द्यावी,

परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनी वापरण्यास बंदी घालावी, बी.ए., बी.कॉम. व बी. एस्सी. प्रथम वर्ष (प्रथम व द्वितीय सत्र) NEP-२०२० पॅटर्न अंतर्गत गृहपरीक्षा व निकाल प्रक्रियेसंदर्भातील वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले.

परीक्षा शिस्तीवर भर

विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, वेळेचे नियोजन आणि शिस्त राखण्यावर विशेष भर दिला आहे. उत्तरपत्रिका मूल्यमापन व निकाल प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी सर्व संबंधित संस्थांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT