Sambhajinagar News : युवा मराठा प्रीमियर लीगचा थरार.ि file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : युवा मराठा प्रीमियर लीगचा थरार

समाजसेवेसाठी निधी संकलन : क्रीडाप्रेमींचा मोठा प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

The third season of the Maratha Premier League cricket tournament

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : युवा मराठा प्रतिष्ठानच्या वतीने २१ ते ४५ वयोगटातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या युवा मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या सिजनमध्ये गुरुवार व शुक्रवारचे सामने चांगलेच रंगले. मागील तीन वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या या स्पर्धेतून मिळणारा निधी समाजसेवेसाठी वापरण्यात येत असल्याने क्रीडाप्रेमींसह सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम ठरत आहे.

दुसऱ्या दिवशी गुरुवारच्या पहिल्या सामन्यात वीर छावा ११ विरुद्ध मराठा वॉरियर्स यांच्यात लढत झाली. अटीतटीच्या सामन्यात मराठा वॉरियर्सने दोन गडी राखून विजय मिळवला. सुनील डावकर सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात शंकर-पार्वती संघाने सिरिया स्टेशनवर ४० धावांनी मात केली. अक्षय ढवळे याने तीन षटकांत २१ धावा देत तब्बल सहा गडी बाद करत सामनावीराचा किताब पटकावला.

शेवटच्या सामन्यात प्रजापिता पँथर्सने देवराज इलेव्हनवर चार धावांनी निसटता विजय मिळवला. जयेश पाटील याने तीन षटकांत आठ धावा देत तीन गडी बाद करत सामनावीराचा किताब पटकावला. तसेच शुक्रवारच्या पहिल्या सामन्यात वीर छावा ११ ने कुलस्वामिनीवर सात गडी राखून विजय मिळवला. परमेश्वर सरोदे तीन घटकांत चार बळी घेत सामनावीर ठरला.

यानंतर नंदिनी टायटन्सने मराठा वॉरियर्सचा सात गडी राखून पराभव केला. अभय भोसले तीन षटकांत १३ धावा देत चार गडी बाद करत सामनावीर ठरला. शेवटच्या सामन्यात शंकर-पार्वतीने देवराज इलेव्हनवर ३७ धावांनी विजय मिळवत दिवसाची सांगता केली. अक्षय माने याने तीन षटकांत तीन गडी बाद करत सामनावीर होण्याचा मान मिळवला.

दरम्यान, स्पर्धेत एकूण आठ संघांचा सहभाग असून, सामने १ फेब्रुव-ारीपर्यंत सुरू राहणार आहेत. उत्साहपूर्ण वातावरणात होत असलेल्या या स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT