Sambhajinagar News : दुरुस्तीसाठी दिलेल्या सोन्याच्या बांगडीसह दुकानदार पसार file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : दुरुस्तीसाठी दिलेल्या सोन्याच्या बांगडीसह दुकानदार पसार

हा प्रकार १४ डिसेंबर २०२५ रोजी केळी बाजारातील एका ज्वेलर्स येथे घडली.

पुढारी वृत्तसेवा

The shopkeeper absconded with the gold bangle given for repair

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सोन्याच्या बांगड्या मोठ्या करण्यासाठी ज्वेलर्सकडे दिल्यानंतर एक बांगडी परत केली; मात्र, उर्वरित ४ लाख ६५ हजार रुपये किमतीची ३० ग्रॅमची बांगडी तीन महिने होऊन देखील दिली नाही. अखेर बांगडी मागण्यासाठी दुकानात गेल्यानंतर महिलेला धक्काबुक्की आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

त्यानंतर दुकानदार दुकान बंद करून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार १४ डिसेंबर २०२५ रोजी केळी बाजारातील एका ज्वेलर्स येथे घडली. या प्रकरणी रोहित संचेती, मनोज संचेती आणि रौनक संचेती विरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संघमित्रा ऊर्फ संगिता रमेश शिरसाठ (५८, रा. जिजाऊ भोसले कॉलनी, जटवाडा रोड) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, शिरसाठ यांनी १६ नोव्हेंबर २०२२ रोजी केळी बाजारातील एस.एम. ज्वेलर्समधून २४ कॅरेट सोन्याच्या दोन बांगड्या खरेदी केल्या होत्या. या बांगड्या लहान होत असल्याने त्या मोठ्या करण्यासाठी १४ डिसेंबर २०२५ रोजी ज्वेलर्सकडे दिल्या. त्यातील ३० ग्रॅम वजनाची एक बांगडी २० फेब्रुवारीला परत मिळाली.

मात्र उर्वरित बांगडी नंतर देण्याचे सांगण्यात आले जीवे मारण्याची दिली धमकी १९ मार्च रोजी शिरसाठ या मेहुणे दिगंबर पाईकडे यांच्यासोबत बांगडी घेण्यासाठी दुकानात गेल्या. त्यावेळी त्यांना दुसऱ्या दिवशी येण्याचे सांगण्यात आले. तीन महिन्यानंतरही बांगडी मिळत नसल्याने पाईकडे यांनी बांगडी आत्ताच द्या असा हट्ट धरला. त्यावर रौनक संचेती याने बांगडी देण्यास नकार देत जीवे मारण्याची धमकी दिली. इतर दोघांनी शिविगाळ करत दुकानाबाहेर काढल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दुकान बंद, दुकानदार पसार

घटनेनंतर उर्वरित ३० ग्रॅमची बांगडी २३ मार्चला देण्याचे दुकानाच्या लेटरहेडवर लिहून देण्यात आले. मात्र, त्या दिवशी दुकान बंद आढळले. शिरसाठ यांनी चौकशी केली असता संचेती कायमचे दुकान बंद करून गेल्याचे कळाले. या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बुधा शिंदे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT