The public campaigning for the Zilla Parishad and Panchayat Samiti elections will end on Thursday (May 5)
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा जाहीर प्रचार गुरुवारी (दि.५) संपणार आहे. प्रचारासाठी उद्या गुरुवारचा दिवस शेवटचा असणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून उद्या संपूर्ण जिल्ह्यात रणधुमाळी उडणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आठ दिवसांपासून जाहीर प्रचार सुरू आहे. सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार दररोज ठिकठिकाणी पदयात्रा, बैठका, सभा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. मात्र आता जाहीर प्रचाराची ही 4 रणधुमाळी फेब्रुवारी रोजी रात्री थांबणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर प्रचारासाठी ५ फेब्रुवारी रात्रीपर्यंतची मुदत दिलेली आहे. ही मुदत गुरुवारी रात्री संपत आहे. त्यामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी गुरुवारचा दिवस प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. परिणामी शेवटच्या दिवशी जिल्हाभरात प्रचाराचा धुराळा उडणार आहे.
जिल्हा परिषदेचे ६३ गट आणि पंचायत समितीच्या १२६ गणांमधील सदस्य निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्हाभरात ८३० उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये जिल्हा परिषद गटांसाठी २८२ आपले नशीब आजमावत आहेत.