महापौर पदासाठी भाजप इच्छुकांचे देव पाण्यात

आज गटनेता ठरणार; मंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीत नगरसेवकांना स्नेहभोजन
Chhatrapati Sambhajinagar mayor election
महापौर पदासाठी भाजप इच्छुकांचे देव पाण्यातFile Photo
Published on
Updated on

The BJP holds power in the municipal corporation, but intense competition has begun within the party over the selection of the mayoral candidate

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता खेचली, मात्र महापौर पदाचा उमेदवार निवडीवरून पक्षात प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. ३) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना बैठक घेऊन मध्यस्ती करावी लागली. त्यांच्या आदेशानुसार कोअर कमिटीने आठ नावांची यादी प्रदेशाकडे पाठविली आहे. आता यातूनच एका नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याने इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. आज गटनेता ठरणार आहे. तत्पूर्वी बुधवारी नगरसेवकांना एकजूट करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शहराध्यक्षांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

Chhatrapati Sambhajinagar mayor election
Crime News : बुलेट चोराला १ वर्ष कारावासाची शिक्षा

महापालिकेच्या साडेतीन दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे. आतापर्यंत सर्वाधिक नगरसेवक असलेला एकमेव पक्ष शिवसेनाच आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कॉंग्रेस आणि गेल्यावेळच्या निवडणुकीत एमआयएम हे पक्ष आहेत. परंतु यंदा सर्वच पक्षांचे रेकॉर्ड भाजपने तोडले आहे. ११५ नगरसेवकांपैकी तब्बल ५७नगरसेवक निवडून आणण्यात भाजपला यश मिळाले. १९८८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकता आली नाही.

मात्र आता एकहाती सत्तेपासून भाजप केवळ एक नगरसेवक दूर आहे. भाजप शिवसेनेसोबत युतीतच सत्ता स्थापन करणार आहे. त्यासाठी महापौर, उपमहापौर आणि गटनेता या पदांसाठी भाजपकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Chhatrapati Sambhajinagar mayor election
स्मार्ट मीटर, वीज दरवाढी विरोधात भाकपची निदर्शने

यंदा महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने पक्षात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. प्रत्येक जण महापौरपदावर दावा करीत आहे. त्यामुळे उमेदवार निवडताना पक्षाचे स्थानिक नेतेही अडचणीत आले आहेत. भाजपमध्ये पक्षादेशच अंतिम निर्णय असतो. त्यामुळे स्थानिकपातळीवर भाजपच्या कोअर कमिटीकडून जी नावे प्रदेशाकडे गेली आहे, त्यातूनच एक नाव जाहीर होणार की, पक्ष त्या यादीशिवाय इतर नावाची घोषणा करेल, हे सांगणे अशक्य आहे.

दरम्यान, पक्षाकडे जी नावे पाठविण्यात आली, त्यापैकी एका नावाची आज गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत घोषणा होईल, असे संकेत शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक इच्छुकाने देव पाण्यात ठेवले आहेत. तसेच पक्षाच्या शिस्तीचे धडे देण्यासाठी मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत शहराध्यक्षांच्या निवासस्थानी ५७ नगरसेवकांना स्नेहभोजन देण्यात आले.

महापौर-उपमहापौरपदासाठी पहिल्या दिवशी प्रत्येकी १ अर्ज वितरित

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता महापौर-उपमहापौरपदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बुधवारी (दि.४) उमेदवारी अर्ज वितरणास पहिल्याच दिवशी महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले, अशी माहिती नगरसचिव नंदकिशोर भोंबे यांनी दिली.

महापालिकेत नव्या शिलेदारांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. नवनिर्वाचितांसाठी प्रशासनाने सर्वसाधारण सभेच्या सभागृहाचे नूतनीकरण केले आहे. अद्ययावत आसन व्यवस्थेसह चारी बाजूंनी स्क्रीन बसविण्यात आल्या आहेत. आता प्रशासनाला पदाधिकारी आणि नगरसेवकांचीच प्रतीक्षा आहे. बुधवारी महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. नगरसचिव कार्यालयातून उमेदवारी अर्जाचे वितरण सुरू करण्यात आले. शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज वितरित केले जाणार आहे. तर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशी महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले आहे, उमेदवारी अर्ज वितरण आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेनंतर येत्या मंगळवारी सकाळी ११ वाजता निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. यात पहिल्यांदा उमेदवारी अर्जाची छाननी केली जाईल. त्यात पात्र-अपात्र अर्ज निश्चित करून त्यानंतर उमेदवारी माघारीसाठी वेळ देण्यात येईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हात उंचावून प्रत्यक्षात निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news