स्मार्ट मीटर, वीज दरवाढी विरोधात भाकपची निदर्शने

महावितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी
sambhajinagar news
स्मार्ट मीटर, वीज दरवाढी विरोधात भाकपची निदर्शनेfile photo
Published on
Updated on

The CPI staged protests against smart meters and electricity price hikes

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट मीटर बसविणे व वीज दरवाढीविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी करण्यात येणाऱ्या आंदोलनाअंतर्गत बुधवारी (दि.४) महावितरणच्या जुबली पार्क येथील कार्यालयासमोर तीव्र निदर्शन करण्यात आली. स्मार्ट मीटर हे केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या आदे शानेच लावले जात असल्याचा आरोप भाकपने यावेळी केला.

sambhajinagar news
Sambhajinagar News : ३२ उंटांचा ताबा पशुपालकांना देण्याचे खंडपीठाचे आदेश

स्मार्ट मीटरचा सरकारशी संबंध नाही, असा अपप्रचार करून काही जण मुद्दाम जनतेत संभ्रम निर्माण करीत असल्याचे भाकप नेत्यांनी सांगितले. तसेच अदानी, मोंटे कार्लो, एनसीसी यासारख्या कंपन्यांना दिलेल्या कंत्राटांद्वारे सरकारच्या परवानगीनेच हे मीटर बसविले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या मीटरला लोकांचा तीव्र विरोध असतानाही गुपचूप व जबरदस्तीने ते लावले जात असल्याने या प्रकाराचा निषेध आंदोलनात करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर लावले जाणार नाहीत, असे जाहीर विधान केले आहे. मात्र त्यानंतरही महावितरणकडून वेगाने मीटर बसविले जात आहेत, असा आरोपही भाकपकडून करण्यात आला.

sambhajinagar news
Crime News : बुलेट चोराला १ वर्ष कारावासाची शिक्षा

तर एनसीसी कंपनीचे कंत्राट रद्द करावे, जबरदस्तीने लावलेले स्मार्ट मीटर काढून जुनेच मीटर बसवावेत, टीओडी पद्धतीतील दरवाढ रद्द करावी, वीज दर कमी करावेत, लोडशेडिंग बंद करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात भाकप राज्य कौन्सिल सदस्य अॅड. अभय टाकसाळ, कॉ. जफर फजलू रहमान, कॉ. राजू हिवर- ाळे, कॉ. रफिक बक्श, मधुकर गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. आता पुढील निदर्शने ४ मार्च रोजी होणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news