राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

राष्ट्रपती उद्या छत्रपती संभाजीनगर शहरात

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या २५ फेब्रुवारी रोजी नियोजित शासकीय कार्यक्रमासाठी शेगाव येथे जाणार असून, त्या छत्रपती संभाजीनगर विमानतळामार्गे प्रवास करणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा

The President will visit Chhatrapati Sambhajinagar city tomorrow

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या २५ फेब्रुवारी रोजी नियोजित शासकीय कार्यक्रमासाठी शेगाव येथे जाणार असून, त्या छत्रपती संभाजीनगर विमानतळामार्गे प्रवास करणार आहेत. या अतिमहत्त्वाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२३) विमानतळावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने रंगीत तालीम घेण्यात आली.

राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलनुसार सुरक्षितता, वाहन ताफा आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्यासाठी सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. ताफ्यातील वाहनांचे नियोजन आणि तंदुरुस्ती तपासण्याची जबाबदारी आरटीओ विभागाची असताना या विभागाचा एकही जबाबदार अधिकारी तालीमकडे फिरकला नाही.

यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांना फैलावर घेतले. अतिविशेष व्यक्तींच्या दौऱ्यात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी समज दिली.

दरम्यान, राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी हॉस्पिटल, वाहनांचा ताफा, अॅम्ब्युलन्स, डॉक्टर, जेवण व राहण्याची व्यवस्था तयार ठेवण्यात आली आहे. विमानतळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, केंद्राकडून सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी टीम संभाजीनगर येथे दाखल झाली आहे. जिल्हा प्रशासन या सर्व बाबींचा आढावा घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT