अनधिकृत होर्डिंग, पोस्टर २४ तासांत काढा

मनपाचा पोस्टर बॉईजला इशारा, फौजदारी गुन्हे दाखल करणार
sambhajinagar news
अनधिकृत होर्डिंग, पोस्टर २४ तासांत काढाfile photo
Published on
Updated on

Remove unauthorized hoardings, posters within 24 hours

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरात ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात पोस्टर्स बॉईजने अनधिकृत होर्डिंग्स, पोस्टर आणि बॅनर्स लावून विद्रुपीकरण केले आहे. हे अनधिकृत होर्डिंग काढतानाच शनिवारी (दि.२१) महापालिकेच्या एका कर्मचार्याला जीव गमवावा लागला.

sambhajinagar news
Crime News : भावाच्या परस्पर बहिणींनी दीड कोटीची संपत्ती लाटली

त्यामुळे महापालिकेने या पोस्टर्सबॉईजकडे वक्रदृष्टी केली असून, येत्या २४ तासांत होर्डिंग्ज, पोस्टर, बॅनरधारकांनी स्वतःहून काढून घ्यावीत, नसता महापालिका संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करेल, अशा इशारा आयुक्त जी. श्रीकांत यांनी सोमवारी (दि. २३) दिला आहे.

महापालिका निवडणुका आणि इतर उत्सवानिमित्त शहरात अनेकांनी अनधिकृत होर्डिंग, पोस्टर आणि बॅनर वाटेल तेथे लावले आहेत. काहींनी तर शहरातील निराला बाजार परिसरात अशा धोकदायक प्रकारे वीजेच्या खांबावर अनाधिकृत बॅनर लावण्यात आले होते.

sambhajinagar news
मनपा विरोधी पक्षनेतेपदी अब्दुल समीर यांची नियुक्ती

विजेच्या खांबांवर तर काहींनी मोठमोठ्या इमारती, ऐतिहासिक वास्तू,चौकाचौकांतील सुंदर बेटांलगत तसेच जोखमीच्या जागेत पोस्टर, बॅनर लावले आहेत. या पोस्टर्समुळे शहराच्या चौकांचे पूर्णतः विद्रुपीकरण झाले आहे.

या कायद्यानुसार होणार गुन्हा दाखल

महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम, १९९५ चे कलम ३. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम २४४ व २४५ तसेच अनधिकृत होर्डिंग किंवा बॅनरमुळे कोणतीही जीवितहानी, अपघात किंवा सार्वजनिक सुरक्षिततेस धोका निर्माण झाल्यास संबंधित व्यक्ती-संस्था यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशाराही आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला आहे.सर्व अनधिकृत होर्डिंग, पोस्टर आणि बॅनर काढण्यात यावे, असे आदेश पदभार घेताच महापौर समीर राजुरकर यांनी दिले होते.

त्यांच्या आदेशानंतर महापालिकेने शुक्रवारपासून या कारवाईचे नियोजन केले. यात शनिवारी सकाळी महापालिकेच्या पथकाने मुकुंदवाडी भागात कारवाई केली. त्यात दोन कर्मचाऱ्यांना पोस्टर काढताना वीजेचा शॉक लागला.

यात एक जण जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर महापालिकेने आता अनधिकृत होर्डिंग्ज, पोस्टर, बॅनर विरोधात धडक मोहीम राबविण्यासह पोस्टर बॉईजविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचाही निर्णय घेतला आहे. येत्या २४ तासांत पोस्टर बॉईजने आपापले होर्डिंग्ज, पोस्टर, बॅनर काढून घेतले नाही, तर महापालिका गुन्हे दाखल करण्यास सुरुवात करेल, असा इशारा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news