मनपा विरोधी पक्षनेतेपदी अब्दुल समीर यांची नियुक्ती

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर अब्दुल समीर साजेद बिल्डर यांची महापौर समीर राजुरकर यांनी नियुक्ती केली.
sambhajinagar news
मनपा विरोधी पक्षनेतेपदी अब्दुल समीर यांची नियुक्तीfile photo
Published on
Updated on

Abdul Sameer appointed as Leader of Opposition in Municipal Corporation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर अब्दुल समीर साजेद बिल्डर यांची महापौर समीर राजुरकर यांनी नियुक्ती केली. गेल्या आठवड्यातच एमआयएमच्या ३२ नगर सेवकांनी महापौरांसमोर समीर बिल्डर यांच्या बाजूने स्वाक्षरीचे अधिकृत पत्र दिले. त्यानुसार सोमवारी या नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

sambhajinagar news
Bogus QR code : जिल्हाधिकाऱ्यांमुळेच बोगस क्यूआर कोड उघडकीस

या नियुक्तीनंतर प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेता यांच्या दालनात येऊन अब्दुल समीर यांचे अभिनंदन केले. यावेळी एमआयएमचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मागील आठवड्यात पक्षाच्या बैठकीत अब्दुल समीर यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी एमआयएमच्या ३२ नगर-सेवकांनी आपल्या सह्यांचे पत्र महापौरांना सादर केले होते. त्यानुसार महापौरांनी अब्दुल समीर यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त केल्याचे पत्र दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news